live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

पुलाचे काम अर्धवट सोडून मक्तेदार गायब ! 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : शनिमंदिराकडून ममुराबादकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लेंडी नाल्यावरील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. हा पूल जुन्या पुलापेक्षा उंच असून नवीन पुलाच्या दोन्ही बाजूला उतार तयार करण्यात येणार होता. परंतु मक्तेदाराने त्याठिकाणी कच्चे मटेरिअल टाकून पुलाच्या दोन्ही बाजूच्या उताराचे काम न करताच गायब झाला आहे. यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. 

ममुराबादकाडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या लेंडी नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात नाल्याचे पाणी पुलावरून वाहत होते. त्यामुळे पुलाची उंची वाढविण्यासाठी तसेच पावसाळ्यात त्या परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून नाल्यावरील पूल तोडून त्याठिकाणी नवीन पूल बांधण्यात आला आहे. पूर्वीच्या पुलापेक्षा हा पूल आता 6 मीटर उंच बांधण्यात आला आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला उतार करण्यासाठी मक्तेदाराने गेल्या आठवड्यात पुलाच्या दोन्ही बाजूला मुरूम टाकून त्यावरून रोलर फिरविले. मात्र हे काम केवळ पुलाच्या एकाच पट्ट्यात केले असून या पुलावरून मोठ्या अवजड वाहनांसह ट्रॅक्‍टरची देखील वाहतूक सुरू झाली आहे. मक्‍तेदार हा पुलाच्या दोन्ही बाजूस उतार तयार करण्याचे काम अर्धवट सोडून निघून गेल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

पुलावर वाहतुकीची कोंडी 
मक्तेदाराने पुलाच्या उताराचे काम करण्यासाठी पुलावर कच्चे मटेरिअल आणून टाकले आहे. त्यामुळे पुलाच्या एकाच बाजूने वाहतूक सुरू असून त्या वेस्ट मटेरीयलमुळे पुलाच्या दुसऱ्या बाजूची वाहतूक बंद आहे. पुलाच्या अर्धवट कामामुळे तसेच त्याठिकाणी पडून असलेल्या वेस्ट मटेरीयलमुळे वाहतूक कोंडी होऊन त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. 

वीज खाबांसह रोलरचा अडथळा 
लेंडी नाल्यावरील पुलावर वीज वाहिनी टाकलेला खांब होता. महावितरणकडून हा खांब स्थलांतरित करण्यात आला आहे. मात्र जुना खांब हा महावितरणने त्याच ठिकाणी राहू दिलेला आहे. तसेच पुलाच्या उताराचे काम करण्यासाठी मक्तेदाराने आणलेले रोलर देखील रस्त्याच्या मधोमध उभे करून मक्तेदार त्याठिकाणाहून निघून गेलेला असून खांब व रोलर वाहतुकीस अडथळा ठरत आहे. 

पाइप लाईनमुळे कामाला विलंब 
चौघुले प्लॉट, कांचननगर, प्रजापत नगर या भागाला पाणीपुरवठा करणारी पाइप लाइन लेंडी नाल्याच्या पुलावरून गेली होती. पुलाचे बांधकाम करीत असताना ही पाइप लाइन तोडून त्याठिकाणी प्लास्टिकचा पाइप टाकून पाणीपुरवठा केला जात होता. आता पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र अमृत योजनेचा पाइपलाइनचे काम रखडलेले असल्याने पुलाच्या कामाला विलंब होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
 
पुलावरून टाकण्यात आलेल्या पाइप लाइनचे काम न झाल्यामुळे रस्त्याचे काम अपूर्ण आहे. पुढील आठवड्यात पाइप लाइनचे कामाला सुरवात होणार असून त्यानंतर पुलाच्या उतार देण्याचे काम देखील पूर्ण होईल. 
-सुनील भोळे, अभियंता बांधकाम विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : आनंद महिंद्रांना देखील भावतोय महाराष्ट्राचा माऊंट एव्हरेस्ट, कळसूबाई शिखराला कशी भेट द्यायची ?

T20 WC 24 Team India : भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

Raghuram Rajan: भारताचा वास्तविक विकास दर 8 ते 8.5 टक्के नाही तर...; रघुराम राजन यांनी दाखवले अर्थव्यवस्थेचे दोन चेहरे

SCROLL FOR NEXT