live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

ग्राउंड रिपोर्टः हंडाभर पाण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट 

संजय पाटील

पारोळा ः अल्प पावसामुळे तालुक्यात पाण्याअभावी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी तर पशुधनासाठी चारा व त्यांचा पाण्याचा प्रश्न कधी नव्हे एवढा यंदा बिकट झाला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तालुक्यातील भोकरबारी व बोरी या दोन्ही धरण, विविध तलावांमध्ये केवळ मृतसाठाच शिल्लक आहे. हंडाभर पाण्यासाठी काही गावात ग्रामस्थांना दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत आहे. 
एकेकाळी बोरी धरणाचा परिसर हिरवळीत बहरत होता. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून हिरवळी ही स्वप्नातच होती की काय? असे जाणवू लागले आहे. तालुक्यातील पाण्याच्या अपूर्ण योजना, प्रशासनाची याबाबत उदासीनता, नावाला वृक्षलागवड, देखभालीत दुर्लक्ष, पाण्याबाबत अधिकाऱ्यांची डोळेझाक. यामुळे तालुक्याला पाणीटंचाईच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. जनावरांना चारा नाही, मजुरांना हाताला काम नाही, रोजंदारी बुडवून कोसोमैल पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती नित्याचीच झाली आहे. 
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे तालुक्याला दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. वेळोवेळी लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला आहे. त्यात प्रामुख्याने आमदार डॉ. सतीश पाटील यांनी पाण्यासाठी आंदोलन छेडून देखील प्रशासनाला त्याची जाग आली नाही. आज गिरणीचे पाणी नदीजोडच्या माध्यमातून तालुक्याला मिळाले असते. या कामासाठी तांत्रिक व आचारसंहितेची कारणे पुढे करून चालढकल करण्यातच वेऴ जाताना दिसत आहे. तालुक्याच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी दूरदृष्टी ठेवत तालुक्याला विकासाकडे नेण्याची चालना दिली. मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे आज भूगर्भाची पातळी मोठ्या प्रमाणात खोलवर गेली आहे. बोरी धरणात अल्पप्रमाणात पाणीसाठा आहे तर भोकरबारी धरण कोरडेठाक पडले आहे. 

तालुक्यात पाण्यासाठी १५ विहीर अधिग्रहण 
दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून जिराळी, शेवगे बुद्रुक, आंबापिंप्री, महाळपूर, भिलाली, शेळावे खुर्द, दगडी सबगव्हण, नेरपाट, चिखलोद खुर्द, हिरापूर, धाबे, उडणीदिगर, विटनेर, इटवे या गावात पंधरा विहिरी अधिग्रहीत करून त्यातून लोकांना पाणी दिले जात आहे. सहा गावांत बोअर अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. 
 
३४ गावांना टँकर 
तालुक्यातील पाण्याचा समस्या निवारणार्थ ३४ गावांना खासगी २२ तर शासकीय २ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी खोलवर जात असल्यामुळे परिसरातील विहिरींनी तळ गाठला. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणी टंचाईमुळे रोजगारावर परिणाम जाणवत आहे. पिण्यासाठी पाणी व गुरांसाठी चारा आणि पाणी यासाठी अनेक कुटुंबे सैरावैरा झाले आहेत. 

जनावरेविना गाव ओस 
तालुक्यात १३ एप्रिलच्या शासकीय आकडेवारीनुसार जनावरांची संख्या १९ हजार ८७८ एवढी असून वडगाव, चहुत्रे, मंगरुळ, मोहाडी, लोणी बुद्रुक, लोणीसिम, लोणी खुर्द, वाघरा- वाघरी यासह अनेक गावात जनावरे आहेत. पशुपालक पाण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी वा शेतपरिसरात शेड करून ठेवताना दिसतात. परिणामी जनावरांविना काही गाव ओस पडताना दिसत आहेत. पाण्याअभावी अंगणात पशुधन डोळ्यासमोर दिसत नसल्याने शेतकरी विवंचनेत आपले दिवस काढीत आहेत. 

मंगरुळ, रत्नापिंप्री परिसरात भीषण टंचाई 
तालुक्यातील मंगरुळसह रत्नापिंप्री दबापिंप्री, होळपिंप्री गावात गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. आजच्या परिस्थितीत मंगरुळ येथे एका टँकरद्वारे सहा फेऱ्या पुरविल्या जात आहेत. गावात चार आड असून, देखील पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. पाणीटंचाई पाहता अबालवृद्ध पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. यामुळे महिलांना व शालेय विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी सर्व दूरपर्यंत भटकावे लागत आहे. रत्नापिंप्री, दबापिंप्री व होळपिंप्री परिसरात सात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. रत्नापिंप्रीसह दबापिंप्री, होळपिंप्री या तिन्ही गावासाठी गृप ग्रामपंचायत असून, पाणी पुरवठ्यासाठी भोकरबारी धरणात दोन विहिरीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, धरणातच शुन्य जलसाठा असल्याने तीव्र पाणीटंचाई आहे. गावातील सार्वजनिक विहिरींचे इतर वापरासाठी खोलीकरण करणे गरजेचे आहे सध्या इतर वापराच्या पाण्यासाठी व्यवस्था करणे देखील असफल होत आहे. भोकरबारी धरणातील विहिरींची मोटर नादुरुस्त झाल्याने सध्या ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळणेही कठीण झाले आहे. 

शहराचा पाणीपुरवठा दहा दिवसांआड 
शहराला बोरी प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जात असला तरी सद्यस्थितीत दहा दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. धरणात पाणीसाठा अल्पप्रमाणात असल्याने नागरिकांनी पाण्याचा अपव्यय न करता पाण्याचा काटकसरीने वापर करावा. ज्या भागात पाणी सोडले जाईल, त्या भागातील नागरिकांनी पाणी भरून झाल्यावर नळ्याचा तोट्या बंद करून पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार व मुख्यधिकारी डॉ. सचिन माने यांनी केले आहे. 
 
जनावरांचा पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. दुभत्या जनावरांसाठी पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे. ज्या शेतातील विहिरीत पाणी असेल, त्या शेतमालकांची विनवणी करून पाणी पाजावे लागत आहे. दारासमोर पशुधन नसल्याने गावे ओस पडले आहेत. 
- अरविंद मराठे, माजी उपसरपंच, रत्नापिंप्री 
 
मंगरुळ गावात जनावरांची संख्या जास्त असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यातच पिण्याच्या पाण्याचाही मोठा प्रश्‍न उद्भवला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन टँकरच्या फेऱ्या वाढविण्याची गरज आहे. 
-दिलीप पाटील, ग्रामस्थ, मंगरु 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT