Agriculture Minister Dada Bhuse
Agriculture Minister Dada Bhuse Agriculture Minister Dada Bhuse
उत्तर महाराष्ट्र

कांदा ठेचा भाकरीची दादा भुसेंनी झोपडीत घेतला आस्वाद!

जगन्नाथ पाटील


कापडणे: येथील कांदा, मुळा, फ्लाॅवर, मिरचीची चवच लय न्यारी असते. येथील प्रत्येक कुटुंबाचे न्याहरी आणि जेवण कांदा, लसूण आणि ठेचाशिवाय पुर्ण होत नाही. या जेवणाची चव कृषी मंत्री दादा भूसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी घेतली. अन तृप्त झालेत. अन आपसूकच सगळ्यांच्या ओठांवर आले कापडणेकरांचा (kapadne) कांदा (Onion) ठेचा भाकरीची लज्जतच लय भारी...(agriculture ministerdada bhuse enjoyed the meal in the hut)



कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज धुळे जिल्ह्यातील पिक पाहणी केली. पेरणी झाल्यानंतर पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पेरणीचे संकट ओढवले आहे. अशा स्थितीमध्ये जिल्ह्यातील सरवड (ता.धुळे) शिवारात मंञी दादा भुसे यांनी पिकांची पाहणी केली. शेतीतील माती उकरत ओलावा बघितला. वेळ गेलेली नाही. उत्पादनात निश्चितच घट येईल असे सांगितले. यानंतर मंत्री भोसले सोंडले येथे एका कार्यक्रमाला गेलेत.



मंत्री दादा भूसे हे दोंडाईचाकडे जातांना सावळदे (ता. शिंदखेडा) येथील एका झोपडीत थांबले. येथे फ्लॉवर, भेंडी, मटकी, कांदा लसूनमिरचीचा ठेचा, पोळी, भाकर व पापड या जेवणाचा आस्वाद घेतला आणि तृप्त ढेकर दिला.

सासूसुनांनी बनविले भोजन
दरम्यान कापडणे येथील आदर्श शेतकरी संभाजी पाटील व महेश पाटील, निवृृत्त शिक्षिका शोभना पाटील आणि प्रतिभा पाटील या सासू सुनांनी हे सुग्रास भोजन तयार केले होते. दरम्यान खानदेशात कांदा, लसूण, मिरची ठेचा याची लज्जतच न्यारी असते. पाहुण्यांना हे जेवण म्हणजे एक मेजवानी असते. त्याची अनुभूती मंत्री भुसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT