esakal | जिल्हा रुग्णालयात महिला, युवकावर 'बायोप्सी' ची शस्त्रक्रिया!
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा रुग्णालयात महिला, युवकावर 'बायोप्सी' ची शस्त्रक्रिया!

जिल्हा रुग्णालयात महिला, युवकावर 'बायोप्सी' ची शस्त्रक्रिया!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (Government Medical College and Hospital) येथे म्यूकरमायकोसिस (Mucormycosis) आजार असलेल्या महिला रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया (Surgery) आज शनिवार (ता.१०) करण्यात आली. एका युवकावरही 'बायोप्सी'ची शस्त्रक्रिया करण्यात आली. दोघांची प्रकृती सुखरूप आहे. (jalgaon government medical college and hospital mucormycosis surgery)

हेही वाचा: इंधन दरवाढीविरोधात जळगावमध्ये काँग्रेसतर्फे साकल रॅली

शहरातील शांतिनिकेतन,अजिंठा चौफुली परिसरातील रहिवासी येथील ३२ वर्षीय महिला म्यूकरमायकोसिस आजारामुळे त्रास होत होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १९ जून रोजी उपचारासाठी दाखल झाली होती. येथे महिलेच्या आजाराचे निदान करण्यात आले. तिला बुरशीचा आजार असल्याचे समजले. श्वास घेण्यास हि त्रास होता . त्यामुळे तातडीने औषधोपचार सुरु करण्यात आले. महिलेवर उपचारासाठी औषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. विजय गायकवाड, डॉ आस्था गनेरीवाल, डॉ. अमित भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलेवर शस्त्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले.


कान नाक घसा विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरोदे, डॉ. हितेंद्र राऊत यांच्यासह सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले, दंत शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. इम्रान पठाण, डॉ. श्रुती शंखपाळ, बधिरिकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटेल, डॉ. अनिल पाटील, डॉ. काजल साळुंखे, डॉ. सचिन पाटील, डॉ. स्वप्निल इंकणे, शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. उमेश जाधव यांनी महिलेवर शस्त्रक्रिया केली.

हेही वाचा: वाळूमाफियांविरोधात चार गावांचा ‘एल्गार’!

शहरातील रथ चौक येथील ३८ वर्षीय युवकावर देखील यावेळी 'बायोप्सी' करण्यात आली. हा युवक ६ जुलै रोजी रुग्णालयात दाखल झाला. त्याला म्युकर मायकोसिस आजाराची लक्षणे जाणवत होती. तपासणी झाल्यावर त्याला डॉक्टरांनी 'बायोप्सी' करण्यास सुचविले. 'बायोप्सी' म्हणजे रोगनिदान करण्यासाठी शरीरातील ऊतींना छेद देऊन त्यांची सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने करायची परीक्षापद्धती असते. आज शस्त्रक्रिया विभागात यशस्वीपणे ही शस्त्रक्रिया पार पडली.

loading image