esakal | इंधन दरवाढीविरोधात जळगावमध्ये काँग्रेसतर्फे साकल रॅली
sakal

बोलून बातमी शोधा

 congress cycle rally

इंधन दरवाढीविरोधात जळगावमध्ये काँग्रेसतर्फे साकल रॅली

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव ः केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या (BJP Central Government ) चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel), एलपीजी गॅस (Gas) खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने (Inflation) जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. या जीवघेण्या महागाई, इंधन दरवाढ विरोधात भाजप प्रणित केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी जळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे ( Jalgaon Congress) सायकल रॅली (Bicycle rally) काढण्यात आली. (jalgaon congress cycle rally against fuel price hike)

हेही वाचा: खचू नका..सरकार शेतकऱ्यांसोबत-दादा भुसे


सायकल रॅलीला काँग्रेस भवन येथून सुरवात होऊन टॉवर चौक, नेहरू पुतळा, बस स्टॅण्डमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय, आकाशवाणी चौक, सिव्हिल हॉस्पिटलमार्गे पुन्हा काँग्रेस भवन येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील डी.जी.पाटील, मदन जाधव, आत्माराम जाधव, मुक्ती हारून, प्रदीप पवार, माजी अध्यक्ष राजीव पाटील, उदय पाटील, जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, इंटक अध्यक्ष भगतसिंग पाटील, ॲड.अविनाश भालेराव, शाम तायडे, योगेंद्रसिंग पाटील, डॉ.जगदीश पाटील, मुक्तगिर देशमुख, राजस कोतवाल, देवेंद्र मराठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. १७ जुलैपर्यंत आंदोलन कार्यक्रमाबाबत जिल्ह्यातील तालुका स्तरावर कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी कॉंग्रेस भवनात बैठक झाली.


मोदींना जनता सळो की पळो करेल
माजी खासदार डॉ.उल्हास पाटील म्हणाले की, देशात दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलसह इतर खाद्य तेलांच्या किमती वाढत आहे. महागाईने जनता होळपळत आहे. मोदी सरकारने गरिबांची थट्टा चालविली आहे. आम्ही या दरवाढी विरोधात दहा किलोमिटरची सायकल रॅली काढून जनतेला जागे केले आहे. मोदी सरकारने आगामी काही दिवसात पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी न केल्यास जनता त्यांना सळो की पळा करून सोडेल.


हे जनआंदोलन आता पेटेल
आमदार शिरीष चौधरी (काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष) ः केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल, तेलाच्या दरात वाढ करून महागाईचा भडका उडविला आहे. यात सर्वच भरडले जात आहे. केंद्र शासनाने याचे दर कमी करणे गरजेचे आहे. नाही केले तर आम्ही रस्तयावर उतरू. जनतेला जागे करण्यासाठी आजची सायकल रॅली आहे. हे आंदोलन आता जनआंदोलन होईल. यापुढेही असेच रस्त्यावर येवून जनआंदोलन आम्ही करू.

loading image