residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

मनसे तटस्थ राहण्याची शक्‍यता, गुरुवारी राज ठाकरेंचा निर्णय 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक ः महापालिकेतील सत्ता जाण्याची भीती निर्माण झालेल्या भारतीय जनता पक्षासाठी आजचा दिवस दिलासा देणारा ठरला. महाशिवआघाडी स्थापन करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गृहित न धरण्याचा संदेश मिळाला आहे. मनसेबाबतचे धोरण पक्षप्रमुख राज ठाकरे गुरुवारी (ता. 21) जाहीर करणार आहेत. त्यात एक तर तटस्थ राहणे किंवा नगरसेवकांना व्हीप बजावून मतदान करणे या दोनच सूचना मिळणार आहेत. तटस्थ राहिल्यास भाजपला थेट मदत होण्याची शक्‍यता आहे. 

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसेने सुरवातीला प्रयत्न केले. परंतु जसे दिवस जवळ येत आहेत, त्याप्रमाणे भाजपचा विश्‍वास अधिक वाढताना दिसत आहे.

गणिते बदलू शकतात

महाशिवआघाडीतील एक-एक पक्ष पक्षश्रेष्ठींचे आदेश शिरसंवाद्य मानण्यास तयार असल्याचा निरोप मिळत असल्याने महाशिवआघाडीसमोर पेच निर्माण होत आहे. महापालिकेत भाजपचे 65 नगरसेवक आहे. शिवसेनेचे 34, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी सात, मनसेचे अपक्ष मिळून सहा तर रिपब्लिकन पक्षाचा एक नगरसेवक आहे. विरोधकांचे सर्व नगरसेवक मिळून 55 संख्या होते. भाजपच्या सात आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्यास भाजप नगरसेवकांची संख्या 58 पर्यंत पोचते. त्यापार्श्‍वभूमीवर मनसेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली, तरी बहुमतासाठी 58 नगरसेवकांची गरज राहणार आहे. त्यात भाजप सहज सत्ता स्थापन करू शकेल. दरम्यान, मनसेच्या नेत्यांनी रविवारी पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी 21 तारखेपर्यंत वेट ऍन्ड वॉचचा संदेश दिला. 

पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी 21 तारखेपर्यंत निर्णय देण्याचा संदेश दिला आहे. त्यांच्या निर्णयानंतर सत्तेत सहभागी व्हायचे की तटस्थतेची भूमिका घ्यायची, याचा निर्णय तेच घेतील. 
- सलीम शेख, माजी गटनेता, मनसे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

SCROLL FOR NEXT