उत्तर महाराष्ट्र

गाव वीस..आणि आरोग्याचा भार केवळ सहा कर्मचाऱ्यांवर !

प्राथमिक आरोग्य केंद्रातील अवघे सहा कर्मचारी परिसरातील वीस गावांचा गाडा ओढत आहेत.

धनराज माळी

वडाळी ः वडाळी (ता. शहादा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भार केवळ सहा कर्मचाऱ्यांवर आहे. या केंद्रांच्या अखत्यारीतील १५ ते २० गावात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. जवळच्या कोंढावळ गावातील निम्म्याहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. हा संसर्ग खैरवे- भडगाव येथेही असून अनेकजण पॉझिटिव्ह आहेत. अर्थातच आरोग्य विभाग अनेकविध उपाययोजना करीत असला तरी वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अवघे सहा कर्मचारी परिसरातील वीस गावांचा गाडा ओढत आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढविल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्याला मदत होईल. कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी सरपंच रामसिंग ठाकरे, पोलिसपाटील गजेंद्रगीर गोसावी, उपसरपंच हिंमत सोनवणे यांनी केली आहे. या केंद्रातील कमी कर्मचारी संख्येमुळे कोविड टेस्ट, लसीकरण करणेसाठी अडथळा येत आहे. शहादा- शिरपूर महामार्गाजवळच असलेल्या वडाळी गावांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे. अनेकदा मागणी करूनही वडाळी आरोग्य केंद्रातील कर्मचारी संख्या वाढवली जात नसल्याने अवघ्या सहा कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. कोरोनाचा उद्रेक वाढत असून, मृत्यूचे प्रमाणही वाढले असल्याने या आरोग्य केंद्रातील कर्मचारी संख्या वाढवावी. कोविड टेस्ट करण्याबरोबरच लसीकरण करून आरोग्य सुविधा देण्यासाठी तालुका आरोग्य विभागाने लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

वडाळी उपकेंद्रात लसीकरण सुरू असून काही कर्मचारी याठिकाणी असतात, तर काही कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरू असलेल्या विलगीकरण कक्षात कार्यरत आहेत. गावात रुग्णांची संख्या पाहण्यासाठी शिक्षक व कर्मचारी गल्ली बोळात फिरत आहेत. १ मे पासून १८ वर्षातील सर्वांना लसीकरण मोफत करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. अश्यावेळी कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या आवश्यक आहे. ती वाढविण्यात यावी.

-गिरीष जगताप, माजी पंचायत समिती सदस्य

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे हादरलं! बालाजीनगरात भरदिवसा आंदेकर टोळीचा गोळीबार, आरोपीच्या भावाची हत्या

Latest Marathi News Live Update : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन

India South Africa Relation: दक्षिण आफ्रिका : भारताचा गांधीकालापासून मित्र

Nagpur News: समृद्धी सर्कल मार्गावरील सिमेंट रस्त्याला तडे

'मला जेलमध्ये टाकाल का...' पापाराझींवर सलमान खान भडकला, म्हणाला...'असले मी १०० जाळेन'

SCROLL FOR NEXT