Revised Municipal Budget 2022-23 and Original Budget 2023-24
Revised Municipal Budget 2022-23 and Original Budget 2023-24 esakal
उत्तर महाराष्ट्र

Municipal Budget : मनपाचे 860 कोटींचे बजेट; मालमत्ता कर, पाणीपट्टीतून 125 कोटींची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा

धुळे : महापालिका आयुक्त देवीदास टेकाळे (Devidas Tekale) यांनी प्रशासनातर्फे महापालिकेचे २०२२-२३ चे सुधारित व २०२३-२४ चे मूळ अंदाजपत्रक मंगळवारी (ता. २८) महापालिकेच्या स्थायी समितीपुढे सादर केले. (Municipal Commissioner presented amended budget and original budget before Standing Committee of Municipal Corporation dhule news)

एकूण ८६० कोटी रुपये खर्चाचे हे अंदाजपत्रक आहे. यातून दोन कोटी ६६ लाख रुपये शिलकीचा अंदाज आहे. दरम्यान, प्रशासनाला मालमत्ता करातून तब्बल १०० कोटी, तर पाणीपट्टीतून २५ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीची विशेष सभा (अंदाजपत्रकीय) मंगळवारी (ता. २८) महापालिकेच्या सभागृहात झाली. सभापती किरण कुलेवार, आयुक्त टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ, लेखाधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.

आयुक्त टेकाळे यांनी महापालिकेचे २०२२-२३ चे सुधारित व २०२३-२४ च्या मूळ अंदाजपत्रकाची प्रत स्थायी समिती सभापती श्रीमती कुलेवार यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर त्यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले. एकूण ८६० कोटी ३२ लाख ६४ हजार रुपये खर्चाचे हे अंदाजपत्रक सादर झाले. यात दोन कोटी ६५ लाख रुपये शिल्लक दाखविण्यात आली.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

दरम्यान, आयुक्त टेकाळे यांनी अंदाजपत्रक सादर केल्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. या अंदाजपत्रकावर आता स्थायी समितीत चर्चा होईल. पदाधिकारी, सदस्यांकडून नवीन काही तरतुदी सुचविल्या जातील व त्यानंतर स्थायी समितीने मंजूर केलेले अंदाजपत्रक पुढे महासभेपुढे अंतिम मंजुरीसाठी जाईल.

संभाव्य उत्पन्न असे (आकडे कोटीत)

मालमत्ता कर व इतर कर......................१००.१९

जीएसटी अनुदान...............................१३७.५४

विकास शुल्क, झोन दाखले इ................१५.०६

बाजार शुल्क, दुकान भाडे, बीओटी प्रकल्प.....१८.८६

शासकीय महसुली अनुदान........................१५.१५

पाणीपट्टी, पाणी विक्री...............................२५.९९

शासकीय योजना..................................३२१.५०

संभाव्य खर्च असा

कर्मचाऱ्यांचे वेतन.........................................६३.३५

सभासद मानधन, निवृत्तिवेतन, कार्यालयीन खर्च आदी...५६.५९

अग्निशमन सेवा, दिवाबत्ती, विद्युत देयके, एलईडी आदी...१६.५४

शौचालय निगा व दुरुस्ती, औषध खरेदी आदी..............१८.६५

मनपा शिक्षण मंडळ..........................................१२.३७

नगरोत्थान, मलनिस्सारण, पाणीपुरवठा आदी योजनांचा हिस्सा...५५.७४

दुर्बल घटक, महिला व बालकल्याण, दिव्यांग, वृक्ष निधी.............२.६७

उच्चदाब वीजदेयके, रसायन खरेदी, पंपिग स्टेशन निगा आदी......२०.७०

प्रलंबित व चालू देयके...............................................७२.१३

विकासकामे, भूसंपादन आदी.........................................१३.१५

शासकीय योजनांतून................................................५४०.७८

सातवा वेतन आयोग फरक...............................................१०

२७३ कोटींची वाढ

मनपा प्रशासनाने मागील वर्षी २०२२-२३ मध्ये एकूण ५८७ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. यंदा २०२३-२४ मध्ये ते ८६० कोटींवर गेले आहे. अर्थात २७३ कोटी रुपयांना यंदाचे प्रशासनाचे बजेट वाढले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT