Disrepair of toilets at Nagar Parishad School No. 8, 10. In the second photo, the wall in the toilet has collapsed.
Disrepair of toilets at Nagar Parishad School No. 8, 10. In the second photo, the wall in the toilet has collapsed. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : दोंडाईचा नगरपरिषद शाळांमध्ये सुविधांचा वानवा; मूलभूत सुविधांपासून विद्यार्थी वंचित

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : नगरपरिषदेच्या शाळा नंबर १० आणि ८ मध्ये भौतिक सोयीसुविधांचा बोजवारा उडाला आहे. शाळेला संरक्षण भिंत, प्रवेशद्वार, स्वच्छतागृहाची दुरवस्था झाल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

त्यामुळे नगरपरिषदेने तत्काळ या शाळांची दुरुस्ती करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.(Municipal Council of India lack of facilities in schools dhule news)

दोंडाईचा नगरपरिषदेच्या प्रशस्त इमारतीला लागूनच छत्रपती शिवाजी महाराज शाळा क्रमांक १०, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळा क्रमांक ८, तसेच झाकिर हुसेन शाळा क्रमांक ११ या तिन्ही शाळा एकाच आवारात भरतात. दरम्यान गुजराती व हिंदी माध्यमाच्या शाळा बंद आहेत. अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या तिन्ही शाळेच्या शालेय परिसरात भौतिक सोयीसुविधांचा अभाव आहे.

शाळेला संरक्षण भिंतच नसल्याने मोकाट जनावरे, डुकरांचा शालेय परिसरात मुक्त वावर असतो. प्रवेशद्वार अभावी शाळेत चोरी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. स्वच्छतागृह, शौचालयाची पडझड झाली आहे. वर्गाची दरवाजे तुटली असून, भिंती पडल्या आहेत. तर शौचखड्डावरील स्लॅबची दुरवस्था झाली आहे.

पालिकेस पत्रव्यवहार

संबंधित शाळेत सुमारे तीनशे विद्यार्थी शिक्षण घेतात. थोर पुरुषांच्या नावाने असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुंदर, स्वच्छ अद्ययावत सुविधा असाव्यात अशी पालकांची मागणी आहे. याबाबत मुख्याध्यापक, पालक यांनी पालिका प्रशासनास पत्रव्यवहार देखील केला आहे. बालकांचा मोफत शिक्षण हमी कायदाच्या अनुषंगाने शाळा, परिसरात दहा माणके पूर्ण असावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

''केंद्र सरकारच्या माध्यमातून उर्दू शाळेला मॉडर्न स्कूल बनविण्यासाठी सर्वेक्षण झाले आहे. आगामी काळात पुढील वर्षात नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करून आवश्यक काम केली जातील.''- देवेंद्रसिंग परदेशी, मुख्याधिकारी नगरपरिषद, दोंडाईचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT