उत्तर महाराष्ट्र

राणेंना पराभूत करण्यासाठी नाशिकमध्ये शिवसेनेची व्यूहरचना 

सकाळवृत्तसेवा

नाशिक - कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे सहा महिन्यांनी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीस नाशिकमधून उभे राहणार असल्याच्या वृत्तामुळे त्यांना घेरण्यासाठी शिवसेनेने व्यूहरचना सुरू केली आहे. त्यास कॉंग्रेसकडूनही प्रतिसाद मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे राणे यांनी नाशिकमधून निवडणूक लढविल्यास त्यांच्याविरोधात शिवसेना, कॉंग्रेस व अन्य पक्ष एकत्र येण्याची दाट शक्‍यता आहे. 

नारायण राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर विधान परिषदेसाठी भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता होती; पण गेल्या आठवड्यात झालेल्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या राणे यांनी पुढील वर्षभरात मी पुन्हा सभागृहात येईन, असा विश्‍वास माध्यमांसमोर व्यक्त केला. पुढील सहा महिन्यांत विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होत आहे. त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरी नगरपालिकेच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत अनुक्रमे भाजप व शिवसेनेने यश मिळविले. जिल्ह्यात भाजप क्रमांक दोनचा पक्ष झाल्याने शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने राणे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनीही या चर्चेला दुजोरा दिला आहे. 

...तर सेना-कॉंग्रेस एकत्र?  
राणे यांच्या आक्रमक स्वभावामुळे त्यांनी शिवसेनेला आतापर्यंत अंगावर घेतले आहे. शिवसेनेला हे शल्य असल्याने राणे यांनी नाशिकमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेना सरसावली आहे. शिवसेनेकडे विधान परिषदेसाठी 191 मते आहेत. त्याखालोखाल भाजपकडे 166 मते आहेत; तर कॉंग्रेसकडे 58 मते आहेत. राणे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास शिवसेना व कॉंग्रेसचे एकचे लक्ष्य असलेल्या राणे यांना विरोधासाठी दोन्ही पक्ष पडद्याआडून एकत्र येण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. 

अपक्षांचा भाव वधारणार 
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण 31 अपक्ष नगरसेवक आहेत. त्यांची मदत घेऊन आवश्‍यक बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अपक्षांचा भाव वधारणार आहे. त्यामुळे सहा महिने अगोदरच आपण स्वतंत्र असल्याचे निरोप अपक्षांकडून भाजप, शिवसेना आणि कॉंग्रेसचे नेते आणि इच्छुकांपर्यंत पोचविले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT