उत्तर महाराष्ट्र

जिल्ह्यात 24 घाटांसाठी 5 डिसेंबरला वाळूचे ई-लिलाव 

सकाळवृत्तसेवा

नाशिक - जिल्ह्यातील 24 ठिकाणी वाळू लिलावासाठी प्रशासनाने ई-ऑक्‍शन केले असून, येत्या 5 डिसेंबरला ऑनलाइन निविदा उघडण्यात येतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (ता. 6) घाटांचे लिलाव होतील. 

जिल्ह्यात दोन वर्षांपासून ई-लिलाव पद्धतीने वाळू घाटांचे लिलाव होतात. ई-लिलाव पद्धतीला प्रतिसाद मिळत नसल्याने गेल्या वर्षी घाटांच्या ऑफसेट रकमेत 25 टक्के घट केल्याने प्रशासनाच्या तिजोरीत केवळ एक कोटी 27 लाखांचाच महसूल जमा झाला. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांच्या परवानगीने वाळू घाट लिलावाची 

प्रक्रिया सुरू केली. शुक्रवारी ई-लिलावाची सूचना प्रसिद्ध झाली. येत्या मंगळवारी 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरला नोंदणी व ऑनलाइन निविदा खरेदी व डाउनलोड करता येणार आहे. याचकाळात ऑनलाइन निविदा भरता येणार असून, निविदा भरण्याची अंतिम मुदत 4 डिसेंबरला सायंकाळी सातपर्यंत असेल. मंगळवारी (ता. 5) सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत निविदा उघडल्या जातील. बुधवारी (ता. 6) लिलाव होतील. 

लिलाव होणारे घाट 
तालुका नदी घाट 

इगतपुरी दारणा उभाडे 
त्र्यंबकेश्‍वर दमणगंगा कास 
निफाड कादवा सुंदरपूर 
जळगाव 1 आणि 2 ः गोदावरी ः तामसवाडी, कोळगाव, खेडलेझुंगे, सायखेडा ठिया 
कळवण गिरणा 
कळवण बुद्रुक ः नाकोडे, जुनी बेज, देसगाव, तांबडी वरखेडा 
दिंडोरी कादवा चिंचखेड, लखमापूर 
मालेगाव गिरणा आघार खुर्द, आघार ब्रुद्रुक, चिंचावड, दाभाडी, वळवाडे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT