Containers and bags of Gutkha seized  esakal
नाशिक

Nashik Crime : 1 कोटीचा गुटखा जप्त; इगतपुरी पोलीसांची मोठी कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : इगतपुरी पोलीसांनी मोठी कारवाई करत नाशिकहुन मुंबईला अवैध गुटखा घेऊन जात असलेले दोन कंटेनर इगतपुरी पोलीसांनी ताब्यात घेतले असुन या दोन कंटेनरसह जवळपास एक कोटी २५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (1 Crore 25 Lakhs including two containers carrying Gutka were seized nashik crime)

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी नाशिक मुंबई महामार्गावरून अवैध गुटख्याची वाहतुक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली असता पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पोलीस उप अधिक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, पोलीस अधिक्षक पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे, पोलीस हवालदार दिपक अहीरे, किशोर खराटे,

चेतन सवस्तरकर, गिरीष बागुल,विनोद टिळे व इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सचिन देसले, मुकेश महिरे, राहुल साळवे, विजय रुद्रे, अभिजीत पोटींदे, निलेश देवराज यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील प्रिंप्रीसदो चौफुलीवर सापळा लावुन नाशिकहुन मुंबईकडे जाणाऱ्या दोन कंटेनरची तपासणी केली असता त्यामधे मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलीसांनी दोन कंटेनर मधील ८० लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला असुन यात 4KSTAR , SHK या कंपनीचा गुटखा पकडला आहे. यासह दोन कंटेनर HR 38 Z3937 व HR 47 E 9140 जप्त करण्यात आले आहे. असे एकुण १ कोटी २८ लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईत चालक सलमान अमीन खान, वय ३० व इरफान अमीन खान, वय ३१ रा. जि. पलवल, हरीयाणा या दोघांना अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडेसह पोलीस पथक करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT