NMC School esakal
नाशिक

NMC School : महापालिकेच्या शिक्षकांना 1 तास Extra! विद्यार्थी टक्का, गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न

विक्रांत मते

NMC School : महापालिका शाळा गुरुवार (ता.१४) पासून सुरू होणार असल्याने त्याअनुषंगाने महापालिका शिक्षण विभागाकडून आचारसंहिता निश्चित करण्यात आली आहे.

त्यामध्ये शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांना एक तास एक्स्ट्रॉ देण्याच्या सूचना प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी यांनी केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांना दिल्या.

यात शाळा सुरू होण्याअगोदर अर्धा तास व शाळा सुटल्यानंतर अर्धा तास असा एक तास मुख्याध्यापक व शिक्षकांना शाळेसाठी द्यावा लागणार आहे. (1 hour extra for municipal teachers Efforts to increase student percentage quality nmc schools nashik news)

महापालिका हद्दीतील खासगी व सरकारी शाळा, १५ जूनपासून नियमितपणे सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या प्रशासनाधिकारी डॉ. चौधरी यांनी केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची बैठक घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता व टक्का वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

गेल्या काही वर्षात महापालिकेच्या शाळांच्या कामकाजामध्ये आलेला ढिसाळपणा व नुकतेच प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याने शिक्षण विभागाची बदनामी झाली.

त्या पार्श्वभूमीवर डॉ. चौधरी यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहे. यामध्ये शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांना शाळा सुरू होण्याच्या अगोदर अर्धा तास व शाळा सुटल्यानंतर अर्धा तास असा एक तास एक्स्ट्रॉ द्यावा लागणार आहे. या कालावधीमध्ये विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्याकडे अधिकाधिक कल देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

विद्यार्थी दिसावा स्मार्ट

महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणारा विद्यार्थी नीटनेटका व स्मार्ट दिसावा याची जबाबदारीदेखील शिक्षकावर टाकण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आरोग्य विषयीच्या सवयी संवर्धित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गोदा गीत बंधनकारक

शाळेच्या परिपाठामध्ये गोदा गीताचा समावेश करण्यात आला आहे. शाळेच्या परिपाठाच्या वेळेस गोदा गीत म्हणणे बंधनकारक करण्यात आले आहे.

महापालिकेच्या शाळांमधील टक्केवारी वाढणे गरजेचे आहे. टक्केवारीअभावी अनेक शाळा वर्ग बंद पडण्याच्या परिस्थितीत आहे. त्यामुळे शालेय शिक्षणाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे ढोलताशांच्या गजरात व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे.

अशी आहे नियमावली

- पंधरा दिवसात शाळेसंदर्भातील प्रशासकीय नियोजन करावे.
- पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन पद्धतीचे पालन करावे.
- हालचाल नोंदवही मध्ये नोंदी कराव्या.
- रजेची रीतसर परवानगी न घेतल्यास कारवाईस पात्र ठरतील.
- विद्यार्थ्यांच्या गणित इंग्रजी व परिसर अभ्यास या विषयांकडे अधिक लक्ष द्यावे.
- गणित व इंग्रजी विषयात समाधान प्रगती दिसावी.
- पालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांचा आढावा बंधनकारक.
- सायबर सुरक्षा संदर्भात उद्बोधन करावे.
- प्रत्येक वर्गात 50 विद्यार्थ्यांची हजेरी अपेक्षित.

"शालेय शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस असल्याने त्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांना शिक्षकांसाठी आचारसंहिता सांगितली आहे त्याचे पालन होणे अपेक्षित आहे."

-डॉ. मिता चौधरी, प्रशासनाधिकारी, महापालिका शिक्षण विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT