2 Antelope die in quarrel esakal
नाशिक

नाशिक : वर्चस्ववादाच्या झुंजीत 2 काळविटांचा मृत्यू

हर्षल गांगुर्डे

गणूर/ सोग्रस (जि. नाशिक) : चांदवड तालुक्यातील रेडगाव खुर्द येथे कांद्याच्या शेतात दोन काळविटांच्या झुंजीत दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. १४) सकाळी घडली. वर्चस्ववादातून ही झुंज झाली असून, त्यात शेतातील ड्रीपच्या नळ्या एकमेकांच्या शिंगात अडकल्याने कुत्र्यांनी देखील याचा फायदा घेत हल्ला केल्याने यात काळविटांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

रेडगाव खुर्द येथील शेतकरी वसंत सावळीराम काळे यांच्या मालकीच्या शेतात ही घटना घडली. याबाबत पोलिस पाटील यांनी तत्काळ वनविभाला कळविले. चांदवड वनविभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता अंदाजे दीड ते दोन वर्षांच्या काळविटांची शिंगे एकमेकांत अडकलेली, शिंगास ड्रीपच्या नळ्यांचा विळखा व कुत्र्यांनी दोघांचे तोडलेले लचके अशा अवस्थेत काळवीट आढळून आले. यावरून वर्चस्ववादातून प्रथम झुंज झाली. त्यामुळे ड्रीपच्या नळ्यांचा गुंता दोघांच्याही शिंगात अडकल्याचे बघून कुत्र्यांनी काळविटांवर हल्ला चढवला आणि यात दोघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला गेला.
पंचनामा होताच वाहेगावसाळ येथील पशुधन विकास अधिकारी मयूर विसपुते यांनी शवविच्छेदन केले. सहायक वन संरक्षक डॉ. सुजित नेवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पी. पी. सूर्यवंशी, वनरक्षक श्रीमती मरशिवणे, वनसंरक्षक एस. के. खंदारे, वनमजूर भरत वाघ, वाहनचालक अशोक शिंदे यांनी काळविटांवर चांदवड वनविभाग कार्यालयाच्या वसाहत हद्दीत अंत्यसंस्कार केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT