
नाशिक : शेतकऱ्याला द्राक्ष व्यापाऱ्याने घातला 3 लाखांचा गंडा
सोग्रस (जि. नाशिक) : चांदवड तालुक्यातील दह्याणे येथील शेतकऱ्याची उत्तर प्रदेश येथील दोघा व्यापाऱ्यांनी दोन लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार वडनेर भैरव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
दह्याणे येथील अरुण पंढरीनाथ भवर यांनी उत्तर प्रदेश येथील सलमान कुरेशी व रामराज सक्सेना (हल्ली रा. खेडगाव, ता. दिंडोरी) या दोघा व्यापाऱ्यांना १११ क्विंटल द्राक्षे २७ रुपये प्रतिकिलो याप्रमाणे विक्री केले होते. खरेदी- विक्रीचा व्यवहार ६ मार्च रोजी झाला होता. मात्र, अद्यापही सलमान कुरेशी व रामराज सक्सेना यांनी पैसे न दिल्यामुळे व त्यांच्याशी कुठलाही संपर्क होत नसल्यामुळे अरुण पवार यांनी फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली आहे. वडनेर भैरव पोलिस तपास करीत आहे.
हेही वाचा: 42 वर्षांच्या संघर्षानंतर शेतकऱ्यांना मिळाले सिंचनासाठी पाणी
हेही वाचा: नाशिक : पोलिस व भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये 'तू तू मै मै'
Web Title: Grapes Trader Defrauded The Farmer Of Rs 3 Lakh Nashik Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..