esakal
esakal
नाशिक

Nashik Crime: खंबाळेत दिवसा 3 घरफोड्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : खंबाळे (ता. इगतपुरी) गावात गुरुवारी (ता. २५) दुपारी चोरट्यांनी घरात कोणी नसल्याने बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्याच्या दागिने चोरले. एकाच वेळी तीन घरे चोरट्यांनी घरफोडी केली.

या धाडसी चोरीत चोरट्यांनी जवळपास ४३ हजार रोख व सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा दीड लाखाचा ऐवज घेऊन पोबारा केला. (3 burglaries in day in Khambale Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चोरीची माहिती मिळताच घोटीचे सहायक निरीक्षक दिलीप खेडकर, उपनिरीक्षक संजय कवडे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक व ठसे तज्ञ यांनाही बोलावण्यात आले.

प्रभारी उपअधीक्षक कविता फडतरे यांनी घटनास्थळी भेट देऊन चोरीची माहिती घेतली. खंबाळे गावातील रामनाथ केरू शिंगोटे यांच्या घरातील रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली.

गणेश पढेर तसेच भगवान पढेर यांच्याही घरातून चोरट्यांनी ऐवज लांबविला. तिन्ही घरातून चोरट्यांनी जवळपास ४३ हजार रोख व एक लाख दहा हजार किमतीचे सोन्याची दागिने असा एकूण एक लाख ५४ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत घोटी पोलिसांत चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : आनंद महिंद्रांना देखील भावतोय महाराष्ट्राचा माऊंट एव्हरेस्ट, 'या' शिखराला कशी भेट द्यायची ?

T20 WC 24 Team India : भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT