Ganesh Nadekar Nitin Ahire Ganesh Nadekar esakal
नाशिक

Nashik Accident News : क्रेन तुटल्याने 3 युवकांचा मृत्यू; गावावर शोककळा

मुळाणे (ता. बागलाण) येथे विहिरीतून गाळ काढत असताना क्रेनचा वायर रोप तुटल्याने तीन युवा कामगारांचा विहिरीत पडून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज रविवारी (ता.४) दुपारी घडली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : मुळाणे (ता. बागलाण) येथे विहिरीतून गाळ काढत असताना क्रेनचा वायर रोप तुटल्याने तीन युवा कामगारांचा विहिरीत पडून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज रविवारी (ता.४) दुपारी घडली.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले तीनही तरूण मुळाणे गावातीलच असून ते विवाहित होते, त्यांचा नुकताच सुरू झालेला संसार उघड्यावर पडल्याने तालुक्यात शोककळा पसरली आहे. (3 youths died due to crane collapse in baglan nashik accident news)

मुळाणे (ता. बागलाण) येथील शेतकरी यशवंत सखाराम रौंदळ यांनी आपल्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम गावातीलच क्रेन मालक विनायक नाडेकर यांना दिले होते. रविवारी (ता.४) नेहमीप्रमाणे दुपारी दीडच्या सुमारास गणेश तुळशीराम नाडेकर (२६), नितीन रामदास अहिरे (२७), गणेश विनायक नाडेकर (२८) हे जेवण करून विहिरीतील गाळ काढण्यासाठी क्रेनद्वारे विहिरीत उतरत होते. याचवेळी अचानक वायर रोप तुटल्याने तीनही तरुण विहिरीत कोसळले. ५० ते ५५ फूट अंतरावरून खोल विहिरीत पडल्याने तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

परिसरातील नागरिकांना ही घटना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत विहिरीत पडलेल्या तिन्ही तरुणांना विहिरीबाहेर काढले. मात्र तोपर्यंत तीनही तरुणांचा मृत्यू झालेला होता. घटनेची माहिती मिळताच सटाण्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही तरुणांचे मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आले.

यावेळी ग्रामीण रुग्णालय परिसरात मोठी गर्दी उसळली होती. दुर्घटनेत मरण पावलेले तिन्ही युवक हे विवाहित असल्याने तिघांचा नवा संसार उघड्यावर पडला आहे. तालुक्यासह मुळाणे गाव परिसरात या हृदयद्रावक घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: पहिल्या यादीत ५३३ शेतकऱ्यांना कर्जमाफी; सहकारमंत्र्यांची माहिती, प्राप्तिकर विभागाच्या माहितीअभावी विलंब

IPL परकीय चलन प्रकरणात ललित मोदींना १६ वर्षांनंतर आफ्रिकेतील न्यायालयाचा दिलासा; ईडीचा दंड रद्द

Latest Marathi Update : 'चलो संसद' आंदोलनामुळे दिल्लीतील १६ मेट्रो स्थानके आजही बंद; कडक सुरक्षा व्यवस्था

Pune Congress Protest: विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ पुणे काँग्रेस आक्रमक; मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी

अर्थपूर्ण पर्स : गरज आणि चैनीतला फरक ओळखा

SCROLL FOR NEXT