Methi esakal
नाशिक

Nashik : आठवडे बाजारात मेथीची जुडी खातेय भाव

दत्ता जाधव

नाशिक : सध्या आषाढ महिना सुरू असल्याने देवीला गोड पुऱ्या आणि मेथीच्या (Fenugreek) भाजीचा नैवेद्य दाखविला जातो. सध्या पावसाच्या रिपरिपमुळे मेथीचे उत्पादन कमी झालेले असल्याने बुधवारच्या आठवडे बाजारात गृहिणींना मेथीच्या एका जुडीसाठी चक्क पन्नास रुपये मोजावे लागले. (50 rupees for judi of methi nashik news)

गत आठवड्यात ऐंशी रुपये किलोपर्यंत पोचलेल्या टोमॅटोची लाली आता कमी झाली असून, बुधवारी (ता. ६) आठवडे बाजारात टोमॅटो तीस रुपये किलोने उपलब्ध होते. इतर पालेभाज्या व फळभाज्यांच्या किमती मात्र स्थिर राहिल्या. पावसामुळे मेथीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यामुळे बाजार समितीतील मेथीची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. मात्र, आषाढातील देवीच्या नैवेद्यासाठी मेथीची भाजीचे महत्त्व असल्याने महिला वर्गाची भाव कमी करण्यासाठी घासाघीस सुरू होती. टोमॅटोचे भावही आता पूर्वपदावर आले आहे.

भाज्यांचे दर असे-

मेथी जुडी - ४० ते ५० रुपये जुडी

कोथिंबीर - २० रुपयांत छोटी जुडी

पालक - १० ते १५ रुपये जुडी

वांगी - ४० रुपये किलो

टोमॅटो - ३० ते ४० रुपये

कोबी गड्डा - १० रुपये

फ्लॉवर गड्डा - १० ते १५ रुपये

बटाटे - ३० रुपये किलो

हिरवी मिरची - ६० रुपये किलो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT