बालेकिल्ला चाचपणीसाठी संजय राऊत नाशिक दौऱ्यावर

Sanjay Raut News
Sanjay Raut Newsesakal

नाशिक : राज्यात घडलेल्या सत्तांतरामध्ये शिवसेनेचे (Shiv sena) ४० आमदार फुटल्याने पक्षासाठी मोठी घटना ठरली आहे. त्यामुळे संघटना बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरले असून नाशिकची जबाबदारी असलेल्या प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांना चाचपणीसाठी नाशिकला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार खासदार संजय राऊत गुरुवार ते शनिवार असे तीन दिवस नाशिकमध्ये राहणार असून शनिवारी (ता.९) नाशिक रोड येथे भव्य कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. (Sanjay Raut on Nashik tour for Balekilla test Maharashtra Political News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर नाशिक मधून कृषी मंत्री दादा भुसे व नांदगावचे आमदार सुहास कांदे त्यांच्या गटात सहभागी झाले. त्यामुळे शिवसेनेला नाशिकमधून मोठा धक्का मानला जात आहे. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शहरी भागात एवढी ताकद आहे, तेवढीच ताकद ग्रामीण भागामध्ये आहे. मात्र शहरी भागात एकनाथ शिंदे यांना मानणारा गट देखील आहे. नगर विकासमंत्री असताना शिंदे यांच्याशी अनेक नगरसेवकांची स्नेहाचे संबंध राहिले. श्री. शिंदे यांनी बंड केल्यानंतर नाशिकची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली आहे. मात्र असे असले तरी संघटना बळकट करण्यासाठी खासदार संजय राऊत हे नाशिकच्या मैदानात उतरत आहेत.

Sanjay Raut News
मतदार यादी प्रसिद्धीला 7 दिवसांची मुदतवाढ

गुरुवारी (ता.७) संध्याकाळी शासकीय विश्रामगृहावर त्यांचे आगमन होईल. शुक्रवारी (ता.८) ज्येष्ठ शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेतील तर शनिवारी (ता.९) नाशिक रोड विभागात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी व शक्ती प्रदर्शन करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निमंत्रण दिली जात असल्याचे कार्यकर्त्यांच्या चर्चेतून सांगण्यात आले.

Sanjay Raut News
Nashik : अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com