सिन्नरच्या कांदा संशोधन केंद्रात खरीपासाठी बियाणे

Onion
Onionesakal

सिन्नर (जि. नाशिक) : खरीप हंगामातील (Kharif Season) कांदा लागवडीसाठी कुंदेवाडी (ता. सिन्नर) येथील राष्ट्रीय बागवानी संशोधन आणि विकास केंद्राच्या वतीने यंदा देखील कांदा बियाणे (Onion Seed) विक्री करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या 'ॲग्री फाऊंड (डार्क रेड)' या वाणासह 'एल-883' ही नवीन प्रजात कुंदेवाडी येथील संशोधन केंद्रात विकसित करण्यात आली असून शेतकऱ्यांना माफक दरात दोनही वाणांचे कांदा बियाणे उपलब्ध करून उपलब्ध देण्यात येणार आहे. (Seeds for kharif at Sinnars onion research center Nashik News)

राष्‍ट्रीय बागवानी संशोधन आणि विकास संस्था अर्थात एनएचआरडीएफ या केंद्र शासनाच्या नियंत्रणाखालील संस्थेमार्फत सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथे कांदा संशोधन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. जुन्या गावरान कांद्यामधून निवड पद्धतीने ऍग्री फाउंडचे तयार करण्यात आले आहे. गर्द लाल रंग, हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटलपर्यंत, 90 ते 100 दिवसांचा पीक कालावधी, 4 ते 6 सेंमी आकार, डबलपट्टी (टाईट स्किन) ही या कांद्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

तर नव्याने विकसित केलेली एल-883 ही व्हरायटीची गर्द लाल रंग, लंबगोल आकार, 300 ते 325 क्विंटलपर्यंत हेक्टरी उत्पादन, पीक कालावधी 75 ते 80 दिवस अशा वैशिष्ट्ये आहेत. प्रायोगिक तत्वावर केलेल्या लागवडीअंती दोन वर्षांपासून या वाणाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे केंद्र प्रमुख बी. पी. रायते यांनी सांगितले.

Onion
Nashik : अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

खाजगी कंपन्यांच्या तुलनेत वाजवी दर...

बाहेर दुकानांमध्ये दोन ते तीन हजार रुपये प्रतिकिलो या दराने कांदा बियाणे विकत घ्यावे लागते. त्या तुलनेत एनएचआरडीएफ मार्फत वाजवी दरात गुणवत्तापूर्ण बियाणे विक्री करण्यात येते. ऍग्री फाऊंडचा दर 1500 रुपये प्रतिकिलो तर एल-883 चा दर 1600 रुपये प्रतिकिलो असा निश्चित करण्यात आला आहे. कुंदेवाडी (सिन्नर) येथेच बागवानी केंद्रात हे बियाणे विक्री करण्यात येणार आहे.

Onion
बालेकिल्ला चाचपणीसाठी संजय राऊत नाशिक दौऱ्यावर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com