Abuse of a woman by a makeup class teacher Filed a crime nashik
Abuse of a woman by a makeup class teacher Filed a crime nashik saka
नाशिक

मेकअप क्लासचालकाकडून महिलेवर अत्याचार; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मेकअप क्लास चालकाने कामानिमित्त भेटायला आलेल्या महिलेला गुंगीचे औषध देत महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गंगापूर पोलिस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून दोन महिलांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ललित निकम, जयेश वाघ, नेहा निकम, ज्योती वाघ, अशी संशयितांची नावे आहेत.

अत्याचार करून महिलेचे अश्लील फोटो, व्हिडिओ काढत ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केला असल्याची फिर्याद संबंधित महिलेने गंगापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. हा प्रकार मे २०१९ ते जुलै २०२२ या कालावधीत शहरातील विविध भागात घडला. यामधील एक ललित निकम यास अटक करण्यात आली आहे. संशयित ललित निकम हे एन. ललित मेकअप क्लासेस चालवितात. निकम यांनी फिर्यादी यांना कामानिमित्त हॉटेल पंचमजवळ बोलविले. या वेळी फिर्यादी संशयितांच्या स्वीफ्ट डिझायर गाडीत बसलेली असताना कोल्ड्रिंक्स मधून गुंगीचे औषध देण्यात आले. त्यानंतर कॉलेज रोडवरील आर्चिस गॅलरीच्या मागे असलेल्या पराग अपार्टमेंटमधील तळ मजल्यावर असलेल्या सलूनमध्ये नेत त्यांच्यावर अत्याचार केला.

हा प्रकार मे २०१९ ते जुलै २०२१ या काळात वेळोवेळी झाल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. तसेच अश्लील फोटो, व्हिडिओ काढून ते फिर्यादीच्या पतीस पाठवण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केला. यातून मे २०२१ मध्ये गर्भधारणा झाल्याने संशयितांनी सदर गर्भ फिर्यादी यांच्या पतीचा असल्याचे सांगून वाघ यांच्या वाघ हॉस्पिटल गंजमाळ येथे गर्भपात केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित ललित निकम यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास गंगापूर पोलिस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha : बारामतीत लेकीचं पारडं जड, सुनेत्रा पवार पिछाडीवर तर सुप्रिया सुळे आघाडीवर, ३४३ चा फरक

India Lok Sabha Election Results Live : मोदींनी पुन्हा घेतली आघाडी! पण अमेठीमधून भाजपला मोठा धक्का, स्मृती इराणी इतक्या हजार मतांनी पिछाडीवर

Maharashtra Lok Sabha Election Results Live : मावळ लोकसभा मतदारातून बारणे यांना १६ हजार मतांची आघाडी

Nagpur Crime : चिमुकलीची हत्या करणाऱ्याला तिहेरी फाशी; तिहेरी फाशीचे पहिलेच प्रकरण

Gold Price Today: आज सोने पुन्हा झाले स्वस्त; लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर सोन्यात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT