Gold Price Today: आज सोने पुन्हा झाले स्वस्त; लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर सोन्यात मोठी घसरण

Gold Silver Price Today: आज 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. सध्याच्या निकालानुसार भाजपला बहुमत असल्याचे दिसते. देशातील निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आज सोन्याच्या भावात घसरण झाली आहे.
Gold Price
Gold Price TodaySakal

Gold Silver Price Today: आज 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. सध्याच्या निकालानुसार भाजपला बहुमत असल्याचे दिसते. देशातील निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आज सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 72,550 रुपयांवर घसरला आहे.

सोमवारच्या तुलनेत सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 100 रुपयांनी घसरला आहे. निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सराफ बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. चांदीचा किरकोळ भाव 92,700 रुपये प्रति किलो आहे. देशातील 12 मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे ते जाणून घेऊया.

दिल्लीत आज सोन्याचा भाव

4 जून 2024 रोजी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव अंदाजे 66,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव अंदाजे 72,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबईत आज सोन्याचा भाव

मुंबईत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुण्यात आज सोन्याचा भाव

मुंबईत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

अहमदाबादमध्ये आज सोन्याचा भाव

अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Gold Price
Bank Clinic: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता कोणतीही तक्रार एकाच पोर्टलवर करता येणार

सोने किती शुद्ध हे कसे ओळखावे?

  • 24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आहे.

  • 23 कॅरेट सोने 95.8 टक्के शुद्ध आहे.

  • 22 कॅरेट सोने 91.6 टक्के शुद्ध आहे.

  • 21 कॅरेट सोने 87.5 टक्के शुद्ध आहे.

  • 18 कॅरेट सोने 75 टक्के शुद्ध असते.

  • 17 कॅरेट सोने 70.8 टक्के शुद्ध आहे.

  • 14 कॅरेट सोने 58.5 टक्के शुद्ध आहे.

  • 9 कॅरेट सोने 37.5 टक्के शुद्ध आहे.

तुम्ही बाजारातून खरेदी केलेल्या सोन्याची शुद्धता त्याच्या कॅरेटवरून ठरते. साधारणपणे 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध मानले जाते. पण या सोन्यापासून दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे दागिने बनवण्यासाठी बहुतेक 22 कॅरेट सोने वापरले जाते.

Gold Price
Share Market Opening: लोकसभा निवडणुकीत काटे की टक्कर; शेअर बाजार उघडताच कोसळला

हॉलमार्ककडे लक्ष द्या

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. ग्राहकांनी हॉलमार्क चिन्ह पाहूनच खरेदी करावी. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ॲक्ट, नियमांनुसार चालते.

नोंद - सोने-चांदी क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com