Aeroplane
Aeroplane 
नाशिक

Nashik Airplane Service : 30 नवीन शहरांत विमानसेवेचा विस्तार; ‘इंडिगो’चे नवीन शेड्यूल

सकाळ वृत्तसेवा

Nashik Airplane Service : इंडिगो कंपनीच्या वतीने ओझर विमानतळावरून विमानसेवेचे नवीन शेडूल जाहीर करण्यात आले आहे. २९ ऑक्टोबरपासून राजधानी दिल्ली उत्तर व दक्षिण. तसेच पूर्व व पश्चिम भारतात विमानसेवा विस्तारणार आहे.

इंडिगो कंपनीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या नवीन शेड्यूलमध्ये उत्तर गोवा, अहमदाबाद, हैदराबाद, इंदूर, अमृतसर, बेंगळरू, भोपाळ, भुवनेश्वर, चेन्नई, कोइमतूर, डेहराडून, दिल्ली, जयपूर, जैसलमेर, कोची, कोलकता, लखनौ, तिरुअनंतपुरम, वाराणसी, आग्रा, चंडीगड, कोची, कोलकता, रायपूर, श्रीनगर, विजयवाडा या महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे. (Airline expansion to 30 new cities by indigo news)

यातील उत्तर गोवा, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, इंदूर या सेवा थेट तर उर्वरित सेवा होपिंग फ्लाइट प्रकारातील आहे. देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडणारी विमानसेवा नाशिकमधून सुरू करावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी या निमित्ताने पूर्ण होत आहे.

इंडिगो कंपनीने जाहीर केलेले नवीन शेड्यूल २९ ऑक्टोबरपासून विंटर सीजनसाठी राहणार आहे. त्यानंतर पुन्हा नव्याने शेड्यूल बदलेल, अशी माहिती निमा एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष मनीष रावल यांनी दिली.

थेट सेवेचे असे आहे नियोजन

- नाशिक-उत्तर गोवा- दुपारी एकला ओझर विमानतळावरून उड्डाण होईल व २.३५ मिनिटांनी पोचेल. २.५५ मिनिटांनी नॉर्थ गोवा येथून उड्डाण होईल व सायंकाळी ४.५० मिनिटांनी ओझर विमानतळावर पोचेल. ओझर विमानतळावरून अहमदाबादसाठी दोन फ्लाइट आहे. नाशिकहून अहमदाबादसाठी रात्री ९.२५ मिनिटांनी उड्डाण होईल व १०.५० मिनिटांनी अहमदाबाद येथे पोचेल.

अहमदाबाद येथून सायंकाळी ७.४० मिनिटांनी उड्डाण होईल व नाशिकच्या ओझर विमानतळावर ९.०५ मिनिटांनी आगमन होईल. सकाळी ९.१५ अहमदाबाद येथून उड्डाण होईल व १०.३५ मिनिटांनी ओझर विमानतळावर विमान उतरेल. ११.०५ मिनिटांनी पुन्हा अहमदाबादसाठी उड्डाण होईल व दुपारी १२.३० ला अहमदाबादला पोचेल.

नागपूरसाठी सकाळी ८.१० ओझरहून उड्डाण होईल व ९.५० मिनिटांनी नागपूरला पोचेल. सायंकाळी सातला नागपूरवरून उड्डाण होईल व रात्री ८.४५ वाजता ओझर विमानतळावर आगमन होईल. नाशिकहून हैदराबादकरिता ५.२५ वाजता उड्डाण होईल व ७.१५ मिनिटांनी हैदराबादला पोचेल. हैदराबादवरून सकाळी १०.५० मिनिटांनी उड्डाण होईल व दुपारी १२.३५ मिनिटांनी आगमन होईल.

सकाळी ६.४५ वाजता इंदूर येथून उड्डाण होईल व सकाळी ७.५० वाजता ओझर विमानतळावर आगमन होईल. रात्री ९.०५ मिनिटांनी इंदूरसाठी उड्डाण होईल व १०.१५ वाजता इंदूर येथे आगमन होईल.

असे आहे होपिंग फ्लाइटचे नियोजन (दररोज)

शहर उड्डाण आगमन मार्गे (व्हाया)
नाशिक-अमृतसर दुपारी १ रात्री ११.३० गोवा
नाशिक-बेंगळरू सायंकाळी ७.२५ रात्री दहा हैदराबाद
नाशिक-भोपाल सकाळी ११.०५ रात्री ७.४५ अहमदाबाद
नाशिक-भुवनेश्वर सायंकाळी. ७.२५ रात्री १०.५० हैदराबाद
नाशिक-चेन्नई दुपारी एक रात्री ५.५० गोवा
नाशिक-दिल्ली सकाळी ८.१० दुपारी १.३५ नागपूर
नाशिक-जयपूर सकाळी ११.०५ रात्री ८.२५ अहमदाबाद
नाशिक-कोलकता सायंकाळी ५.२५ रात्री ११ हैदराबाद
नाशिक-वाराणसी सकाळी ११.०५ दुपारी ४.५५ अहमदाबाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

Manoj Jarange: उपोषणाला आता अंतरवलीच्या नागरिकांचाच विरोध! जरांगे म्हणतात, आता मन...

SL vs RSA T20 WC 2024 : आफ्रिकेला 77 धावा करताना फुटला घाम; श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलं टेन्शन

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

SCROLL FOR NEXT