Anandacha Shidha esakal
नाशिक

Anandacha Shidha : रवा, साखर प्राप्त; डाळ, तेलाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शासनाने सण-उत्सवाच्या तोंडावर शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने १४ एप्रिलपर्यंत आनंदाचा शिधा देण्याची तयारी चालविली आहे.

नाशिक जिल्ह्याला ‘आनंदाचा शिधा’अंतर्गत जिल्ह्यात वाटपासाठी साखर आणि रवा प्राप्त झाला आहे. परंतु अजूनही पुरवठा विभागाला चनाडाळ, पामतेलासह पिशव्यांची प्रतीक्षा आहे. हे सर्व अन्नपदार्थ प्राप्त झाल्यानंतरच त्यांचे वाटप करता येणार असल्याचे दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारक पात्र लाभार्थींना आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

गुढीपाडव्याला हा शिधा वितरित करणे शक्य होऊ शकले नाही. परिणामी, १४ एप्रिलपर्यंत हा शिधा वितरित केला जाणार असल्याने त्यासाठी पुरवठा विभागाचे प्रयत्न सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यात सात लाख ८२ हजार ५६२ कुटुंबांना आनंदाच्या शिधाचे किट वाटण्यात येणार आहे. या किटमध्ये प्रत्येकी एक किलो साखर, रवा आणि चनाडाळीचा समावेश आहे. याशिवाय एक लिटर पामतेलही देण्यात येणार आहे.

परंतु या सर्व वस्तू जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झालेल्या नाहीत. शुक्रवारी जिल्ह्यासाठी ६० हजार किलो साखर आणि ८८ हजार किलो रवा प्राप्त झाला आहे. परंतु चनाडाळ, पामतेल आणि एकत्रित किट देण्यासाठीच्या पिशव्या प्राप्त झाल्या नसल्याने जिल्ह्यात अद्याप वाटप सुरू होऊ शकलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT