municipal schools become lake
municipal schools become lake esakal
नाशिक

आयेशानगर शाळेला तलावाचे स्वरूप; विद्यार्थ्यांची कसरत

प्रमोद सावंत

मालेगाव : शहर व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून दमदार पावसाने (Heavy Rains) हजेरी लावली. पावसामुळे पूर्व भागातील गटारींना नाल्याचे स्वरूप आले आहे. काही भागात गटारींचे सांडपाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली. शहरातील अनेक भागांत गटारी वेळेवर स्वच्छ केल्या जात नाहीत. गटारीत प्लॅस्टिक पिशव्या असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पाणी गल्लीबोळांत येते. सांडपाण्यामुळे महापालिकेच्या (Municipality) आयेशानगर भागातील चारही शाळांच्या (Schools) आवारात पाणी शिरल्याने शिक्षकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. (Ayeshanagar school suffer due to monsoon in malegaon Nashik News)

येथील आयेशानगर भागातील उर्दू शाळा क्रमांक २६, ५२, ७२ व मराठी शाळा क्रमांक ११ च्या परिसरात गटारीचे पाणी आवारात शिरते. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना शाळेत शिकविताना दुर्गंधी व डासांचा सामाना करावा लागत आहे. या चारही शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे सुमारे बाराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षकांनी व स्थानिक नागरिकांनी जवळच्या प्रभाग अधिकारी व स्वच्छता विभागाकडे तक्रार देऊनही शाळेचा परिसर स्वच्छ केला जात नाही. आयेशानगर भागात नळांना पाणी येते. त्या-त्या वेळी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या गटारींचे पाणी शाळा आवारात येते. गटारीच्या पाण्याबरोबर प्लॅस्टिक कचरा शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात जमा होतो.

शाळेत येणाऱ्या पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. सांडपाणी, दुर्गंधी, मच्छरांचे साम्राज्य व घाणीतून वाट काढावी लागत असल्याने पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत नाहीत. शाळेत आलेले विद्यार्थी प्रसंगी मोठ्या टेबलच्या सहाय्याने स्वच्छतागृहाच्या भिंतीवर चढून विद्यार्थी खाली उतरतात. अवधानाने विद्यार्थी खाली पडले, तर त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. महापालिकेने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी महापालिकेने तातडीने स्वच्छता करावी व विद्यार्थिहिताचे रक्षण करावे. तसेच शाळेच्या आवारात नेहमीच पाणी साचत असल्याने पालकही त्या शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश घेत नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. महापालिका प्रशासनाचे या समस्यांकडे होणारे दुर्लक्ष गंभीर असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT