saraf bazar 1.jpg
saraf bazar 1.jpg 
नाशिक

सुरक्षिततेचे नियम पाळत सराफी व्यावसायिकांचे व्यवहार पूर्ववत

सकाळवृत्तसेवा

नाशिक ः प्रशासनाला सहकार्य व्हावे, या हेतूने आठवडाभर सराफ बाजार बंदचा निर्णय घेतला होता. याबाबत काही जणांकडून ग्राहकांमध्ये चुकीचा संदेश पसरविला जात आहे. परंतु सराफ बाजार ग्राहक व व्यावसायिक दोघांसाठीही सुरक्षित असून, गुरुवार (ता. ९)पासूनचा बंद मागे घेत आहोत. प्रशासनाचे सुरक्षाविषयक सर्व नियम पाळणार असल्याचे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी सांगितले.

कोरोना रुग्ण सापडल्याची अफवा 

ग्राहक व सराफी व्यावसायिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आठवडाभर सराफी व्यावसायिकांनी बंदची हाक दिली हाती. त्याला बहुसंख्य व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला. मात्र या काळातही काही छोट्या- मोठ्या पेढ्या सुरूच होत्या. त्यामुळे गुरुवारपासून सर्वच सुवर्णपेढ्या सुरू राहतील, असे असोसिएशनतर्फे कळविण्यात आले. सराफ बाजारात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्याच्या वृत्ताचाही त्यांनी इन्कार केला. सराफ बाजारातील स्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, ग्राहकांनी निसंकोच खरेदीसाठी यावे, असे आवाहनही त्यांनी केले.


ऑनलाइनचा पर्याय उपलब्ध
गर्दी टाळून सुरक्षित सोने खरेदीचा पर्याय सराफी व्यावसायिकांनी दिला आहे. ग्राहकांसाठी सोने खरेदीसाठी ऑनलाइन बुकिंग, फोन, मोबाईल किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सोने खरेदीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. काही बड्या पेढ्यांनी बदलत्या परिस्थितीत घरपोच सेवा देण्याचीही तयारी केली आहे.

खरेदीपेक्षा मोडीकडे अधिक कल
केल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावाने नवनवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक आस्थापने अद्यापही बंदच आहेत. त्यामुळे खरेदीपेक्षा सोने मोडण्याकडे नागरिकांचा कल आहे.

सराफ बाजाराबाहेरील काही व्यावसायिक चुकीच्या पद्धतीने बातम्यांचा विपर्यास करून संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत. त्यातून समाजात नकारात्मक संदेश जात आहे. त्यामुळे बंद मागे घेतला असून, उद्यापासून प्रशासनाचे नियम पाळून बाजार सुरू राहील.
- चेतन राजापूरकर, अध्यक्ष, नाशिक सराफ असेसिएशन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT