bharti 1.jpg 
नाशिक

महिलेच्या मृत्यूनंतर पोलीस यंत्रणेला जाग; नायलॉन मांजा विक्रीप्रकरणी शहरात पाच जणांवर गुन्हे 

विनोद बेदरकर

नाशिक : नायलॉन मांजामुळे महिलेचा मृत्यू झाल्यानंतर गडबडून जाग आलेल्या पोलिस यंत्रणेने नायलॉन मांजा विक्री प्रकरणी कारवाया सुरू केल्या आहेत. गुरुवारी शहरातील विविध भागांतील पाच मांजा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच नायलॉन मांजा विक्री प्रकरणी पोलिसांनी माहिती देण्याचे आवाहन केले आहे. 

महिलेच्या मृत्यूनंतर पोलीस यंत्रणेला जाग

द्वारका परिसरात उड्डाणपुलावर नायलॉन मांजामुळे दुचाकीवरून चाललेल्या महिलेचा मृत्यू झाला. जीवघेण्या मांजामुळे बळी गेल्यानंतर शहर पोलिस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी गुरुवारपासून नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाया सुरू केल्या आहेत. गुरुवारी पोलिस उपायुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर आणि नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मांजा विक्रेत्यांवर छापे टाकून पोलिसांनी कारवाया केल्या. त्यात सातपूरला ३५० रुपयांचे मांजाचे पाच रीळ, इंदिरानगरला पाच रीळ, उपनगरला दोन हजार ४०० रुपयांचे आठ रीळ, नाशिक रोडला ३० रीळ याप्रमाणे सहा हजार १५० रुपयांचे ४८ रीळ जप्त करण्यात आले. 

पोलिसांना कळवा 
शहर पोलिसांनी शहरातील नायलॉन मांजा विक्रीला प्रतिबंध केला असून, अवैधपणे नायलॉन मांजा विक्री होत असल्याचे आढळल्यास, नागरिकांनी शहर पोलिसांच्या ०२५३-२३०५२३३ किंवा ०२५३-२३०५२५४ या नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China Fireworks Factory Explosion : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; 21 कामगारांचा होरपळून मृत्यू, 61 जण जखमी, आकाशात धुराचे प्रचंड लोट

"मला पुन्हा सांगू नका की..." जसप्रीत बुमराहच्या 'त्या' चुकीवर सुनील गावसकर भडकले; नेमकं काय घडलं?

Mumbai: तीन अल्पवयीन मुलांकडून तरुणावर हल्ला, डोक्यात अडकलेला कोयता घेऊन तरुण रुग्णालयात; भीषण दृश्य समोर

Solapur Protest: बालिकेवरील अत्याचाराविरोधात सोलापूरकर रस्त्यावर, नसरापूर घटनेचा निषेध, नागरिकांचा कॅंडल मार्च..

Latest Marathi News Live Update : सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नसरापूर घटनेचा निषेध

SCROLL FOR NEXT