esakal | ह्रदयद्रावक! केवळ लेकरासाठीच मातेचे कष्ट अन् धडपड; नियतीचा घाला आला आणि सहा वर्षाचं लेकरू झालं पोरकं
sakal

बोलून बातमी शोधा

bharti jadhav.jpg

भारतीचा घटस्फोट झाला होता. त्यांना सहा वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्यावर घराची जबाबदारी असल्याने त्या कंपनीत नोकरी करत होत्या. पण अशातही हिम्मत धरून केवळ लेकरासाठीच जगत त्याची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत होत्या. पण अचानक नियतीचा असा घाला आणि सारं काही उध्वस्त झाले. आणि सहा वर्षाचे लेकरू पोरके झाले. 

ह्रदयद्रावक! केवळ लेकरासाठीच मातेचे कष्ट अन् धडपड; नियतीचा घाला आला आणि सहा वर्षाचं लेकरू झालं पोरकं

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भारतीचा घटस्फोट झाला होता. त्यांना सहा वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्यावर घराची जबाबदारी असल्याने त्या कंपनीत नोकरी करत होत्या. पण अशातही हिम्मत धरून केवळ लेकरासाठीच जगत त्याची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत होत्या. पण अचानक नियतीचा असा घाला आणि सारं काही उध्वस्त झाले. आणि सहा वर्षाचे लेकरू पोरके झाले. 

आणि सहा वर्षाचे लेकरू पोरके झाले....

भारती मारुती जाधव (वय ४६, रा. अंबड) असे दुर्दैवी महिलेचे नाव आहे. भारतीचा घटस्फोट झाला होता. त्यांना सहा वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्यावर घराची जबाबदारी असल्याने त्या कंपनीत नोकरी करत होत्या. द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाउसजवळ उड्डाणपुलावर असा भयानक प्रकार घडला. हिरावाडीतील रहिवासी असलेल्या भारती जाधव अंबड एमआयडीत कामाला होत्या. त्या सोमवारी कामावरून सुटी झाल्यानंतर दुचाकीवरून हिरावाडीकडे निघाल्या होत्या. द्वारका उड्डाणपुलावरून जात असताना पतंगाचा मांजा अचानक त्यांच्या मानेला अडकल्याने गंभीर जखमी झाल्या. जखमी अवस्‍थेत रस्त्यावर पडल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. भारती जाधव पंचवटीतील हिरावाडीत जात असताना मांजाने गळा कापून सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

तोपर्यंत सारं काही संपलं होतं....
मात्र, तोपर्यंत मोठा रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरून त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला, मृत महिलेच्या भावाने ओळख पटविली. भद्रकाली पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दखल झाला आहे. वर्षातील नायलॉन मांजामुळे महिलेच्या रूपात पहिला बळी गेला आहे. पोलिस, महसूल प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही आणि पोलिसांनी कारवाई करूनदेखील जीवघेण्या मांजाचा धोका आजही कायम असल्याचे या घटनेच्या निमित्ताने पुढे आले आहे. 

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

हिरावाडी येथील भारती मारुती जाधव (वय ४६) यांचा नायलॉन मांजाने सोमवारी (ता. २८) मृत्यू झाल्याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. २९) जिल्हा रुग्णालय आवारात ठिय्या देत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. महिलेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्यासह नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. 
महिलेच्या नातेवाइकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने जिल्हा रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. सरकारवाडा तसेच भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत सोमवंशी आणि साजन सोनवणे घटनास्थळी दाखल झाले. 

मांजा विक्रेत्यांवर कारवाईचे आश्‍वासन; मुलाची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी

भारतीच्या मृत्यूस प्रशासनाची हलगर्जी कारणीभूत आहे. त्यांच्या मुलाचे शिक्षण, आरोग्य व नोकरीची जबाबदारी प्रशासनाने घेत आर्थिक मदत करावी. नायलॉन मांजा विक्रीस २०१६ पासून बंदी आहे. तरीही शहरात सर्रासपणे विक्री होत आहे. मांजामुळे कोणाचाही बळी जाऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन, वन विभाग तसेच पोलिस विभागाने योग्य खबरदारी घेत कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन साजन सोनवणे यांना देण्यात आले. माजी आमदार अनिल कदम, बसपचे नाशिक मध्यचे अध्यक्ष दीपक डोके, नारायण गायकवाड आदी उपस्थित होते. तहसीलदार अनिल दौंडे यांनी आंदोलकांची भेट घेत आर्थिक मदतीसह मांजा विक्रेत्यांवर कारवाईचे आश्‍वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी मृतदेह ताब्यात घेत आंदोलन मागे घेतले.

go to top