Dadasaheb Falke Memorial
Dadasaheb Falke Memorial esakal
नाशिक

नाशिक : फाळके स्मारकाचा पुनर्विकास होणार

विक्रांत मते

नाशिक : पांडव लेण्यांच्या पायथ्याशी असलेल्या भारतरत्न दादासाहेब फाळके स्मारकाचा (Bharat Ratna Dadasaheb Phalke Memorial) फिल्मसिटीच्या (Filmcity) धर्तीवर विकास करण्यासाठी महापालिकेने (NMC) पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर तिसऱ्यांदा काढण्यात आलेल्या स्वारस्य देकारात प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन देसाई (Director Nitin Desai) यांच्या एनडी स्टुडिओ कंपनी पात्र ठरली. महापालिका आयुक्त कैलास जाधव (Municipal Commissioner Kailas Jadhav) यांच्या दालनात स्मारकाच्या पुनर्विकासाचे मॉडेल (Model of redevelopment) देसाई यांनी सादर केले. आर्थिक देकार खुला केल्यानंतर त्यात कंपनी पात्र ठरल्यास पुनर्विकासासाठी करार केला जाईल.

महापालिकेकडून पांडव लेण्याच्या पायथ्याशी २९ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या स्मारकाला सुरवातीच्या काळात नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु, स्मारकाचे टप्प्याटप्पाने खासगीकरण (Privatization) करताना नगरसेवकांच्या (Corporators) कार्यकर्त्यांना विविध प्रकारची कामे दिल्याने बट्ट्याबोळ उडाला. स्मारकाची रया जात असताना उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात घट झाली. तब्बल चोवीस वर्षानंतर आता स्मारकाच्या पुनर्विकासाचा विषय पुढे आला.

चित्रपटसृष्टीचे जनक (The Father of Indian Cinema) असलेल्या दादासाहेब फाळके यांची जन्म व कर्मभूमी नाशिक (Nashik) असल्याने स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात ओपन थिएटर, उद्यान, कॅफेटेरिया, वस्तूंचे कायमस्वरूपी प्रदर्शन होते. रया गेल्याने आता दादासाहेबांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून फाळके स्मारकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुनर्विकासासाठी स्वारस्य देकार मागविण्यात आले. एनडी स्टुडिओ आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड, मंत्रा एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांनी स्वारस्य देकार दाखल केले. तांत्रिक बिडमध्ये (Technical Bid) मंत्रा कंपनीकडून फायनान्शिअल बिड भरल्याने कंपनी अपात्र ठरली. तिसऱ्यांदा फेर निविदा (Tender) काढण्यात आली, त्यात आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पात्र ठरली. आर्थिक देकार खुले केल्यानंतर प्रस्ताव योग्य वाटल्यास पुनर्विकासाचे काम दिले जाणार आहे.

कर्जतच्या धर्तीवर विकास

नितीन देसाई यांचा कर्जत (Karjat) येथे स्टुडिओ आहे. त्याच धर्तीवर स्मारकाचा विकास केला जाणार आहे. येथे चित्रीकरणाला प्राधान्य दिले जाणार आहे. पुनर्विकासाचा पंचवीस वर्षांचा करार होणार असून, बुद्धविहारचा परिसर वगळता अन्य परिसरावर सुमारे ८९ कोटी रुपये खर्च होईल.

"कर्जत येथील स्टुडिओच्या माध्यमातून जवळपास २६ गावांमधील नागरिकांना रोजगार मिळाला आहे. पुनर्विकासाचे काम मिळाल्यास येथेही रोजगार निर्मिती होईल. त्याचबरोबर दादासाहेब फाळके यांना सर्वोत्कृष्ट श्रद्धांजली ठरेल."

- नितीन देसाई, प्रसिद्ध दिग्दर्शक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा 'हवामान'चा इशारा

SCROLL FOR NEXT