Civil Hospital esakal
नाशिक

Nashik Civil Hospital: सिव्हिलमध्ये सावळागोंधळ; जिवंत महिलेस दाखविले मृत

सकाळ वृत्तसेवा

Nashik Civil Hospital : येथील जिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. जिवंत महिलेस मृत दाखविण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

सदरची बाब काहीवेळाने लक्षात येताच आरोग्य यंत्रणा जागी झाली. त्यानंतर नव्याने कागदोपत्री महिला अनोळखी मृत आणि जिवंत महिला उपचार घेत असल्याचा उल्लेख करण्यात आला. (Dead shown to living woman in civil hospital nashik news)

अनोळखी वयोवृद्ध महिला ३ नोव्हेंबरला दुपारी नाशिक रोड बसस्थानकाजवळ आजारपणाच्या स्थितीत मिळून आली होती. वयोवृद्ध महिलेस रुग्णवाहिकेमार्फत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महिलेवर रुग्णालयात ५ नोव्हेंबरपर्यंत उपचार सुरू होते. उपचारादरम्यान महिलेचा ५ नोव्हेंबरला सकाळी ११ ला मृत्यू झाला, अशी नाशिक रोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा रुग्णालय पोलिस चौकीतून नाशिक रोड पोलिसांना कळविण्यात आले होते.

अनुसया सीताराम माळी (रा. जालना) या ४ नोव्हेंबरला दुपारी १ च्यादरम्यान भद्रकाली हद्दीत अशक्तपणा आल्याने बेवारस आढळून आल्या. त्यांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी तपासणी करत तिला मृत घोषित केले. प्रत्यक्षात त्या जिवंत असल्याचे आढळून आले.

अनोळखी मृत महिलेचे नाव अनुसया माळी असल्याचे संबंधितांकडून पोलिस व आरोग्य यंत्रणेला सांगण्यात आले. प्रत्यक्षात अनुसया माळी यांचा मृत्यू झाला नसून, त्या उपचार घेत असल्याचे समोर आले. यावरून जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon: काही तास बाकी! लवकरच मान्सून केरळात धडकणार, राज्यात जोरदार पाऊस पडणार; हवामान विभागाचा इशारा

IPL 2026: RCB च्या विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये विराटची भुवनेश्वर कुमारसोबत फुगडी; Viral Video ने वेधलं लक्ष

धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी केलं लग्न; सत्य समोर येताच पायाखालची जमीनच सरकली, असं काय घडलं?

"ते नातं म्हणजे म्हणजे भयानक स्वप्न !" राज कपूर यांच्या प्रेमाचा नर्गिस यांनी केलेला अपमान

Latest Marathi News Live Update : साक्री तालुक्यात कपाशी लागवडीला वेग; शेतशिवारात लगबग वाढली

SCROLL FOR NEXT