suraj mandre Sakal
नाशिक

मतदार यादीत दुबार नावे; जिल्हाधिकाऱ्यांचा फौजदारी कारवाई इशारा

विनोद बेदरकर

नाशिक : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादी शुद्धीकरण मोहीम सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी दुबार नावे कमी करण्यासाठी मोहिमेत सहभागी व्हावे. यादीत जाणीवपूर्वक दुबार नावे ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या व्यक्तीविरोधात निवडणूक कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला.


जिल्ह्यातील मतदार नोंदणीत मोठा सावळागोंधळ असल्याचे पुढे आले आहे. शिवसेनेने दुबार मतदारांची यादी जाहीर करीत मतदार यादीतील उणिवा चव्हाट्यावर आणल्या. भाजपच्या विजयात या बोगस मतदानाचा वाटा असल्याची तक्रार केल्यानंतर प्रशासन कामाला लागले आहे. मतदार यादीतील दुबार नावे कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी तालुकास्तरावर व तहसील कार्यालयात कार्यवाही सुरू केली आहे. त्यात दुबार नाव कमी करताना थेट मतदारांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या मतदार यादीबाबत असलेल्या संकेतस्थळ, आयोगाच्या हेल्पलाइन नंबरवरून मतदारयादीत नावाची दुबार नोंदणी झाली नसल्याची खात्री करावी. यादीत दुबार नाव आढळल्यास ते कमी करण्यासाठी तहसील कार्यालयात नागरिकांनी संपर्क साधावा. नागरिक, लोकप्रतिनिधी व प्रशासन सर्वांनी मिळून मतदारयादी शुद्ध व अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरणात 24 तासांत 3.90 TMC पाण्याची आवक! 67 टीएमसीचा टप्पा पार, महाबळेश्वर-नवजात मुसळधार; पाहा आजची ताजी आकडेवारी

जितेंद्र यांनी विकत घेतलेला 4.25 लाखांना बंगला, आज त्याची किंमत 450 कोटी, जितेंद्र यांची मास्टरस्ट्रोक डील

Latest Marathi Update : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी जंतर-मंतरवर दाखल

Satara Loan Waiver: सातारा जिल्ह्यात ५४ हजार खाती कर्जमुक्तीकडे; बॅंकांमधील माहिती पोर्टलवर अपलोड, ५६९.४० कोटी होणार माफ

IND vs ZIM, T20I: 'Vaibhav Sooryavanshi ने चूका सुधारण्यावर लक्ष दिले असेलच, त्यामुळे...' श्रेयस अय्यरचे मोठे विधान

SCROLL FOR NEXT