esakal | नाशिकमध्ये डेंगी, चिकूनगुनियाचा उद्रेक; गाठला ५ वर्षांतील उच्चांक
sakal

बोलून बातमी शोधा

डेंगी, चिकूनगुनिया

नाशिकमध्ये डेंगी, चिकूनगुनिया रुग्णांचा ५ वर्षांतील उच्चांक

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शहरात चिकूनगुनिया व डेंगीचा उद्रेक कायम असून, जनजागृतीसह विविध उपाययोजना कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील चौदा दिवसांमध्ये चिकूनगुनियाचे ९५, तर डेंगीचे १४० रुग्ण आढळले. पाच वर्षांतील उच्चांकी या आजारांच्या रुग्णांची संख्या बनली आहे. साडेआठ महिन्यात चिकूनगुणियाचे ७३७, तर डेंगीचे ७१७ रुग्ण आढळले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू असताना डेंगी व चिकूनगुनिया आजाराने तोंड वर काढले आहे. महापालिकेकडे प्राप्त होणाऱ्या आकडेवारीपेक्षा खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंगी व चिकूनगुनियाचे रुग्ण उपचार घेत आहेत. डेंगीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने जनजागृती मोहीम हाती घेतली, परंतु त्याचा उपयोग होताना दिसत नाही. शहरात औषधांची फवारणी होत नसल्याची बाब समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात शहरात ३११ नागरिकांना डेंगीचा बाधा झाली होती, तर चिकूनगुनियाचे २१० रुग्ण आढळले होते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात १४० डेंगीचे रुग्ण आढळले. चिकूनगुनियाचे ९५ रुग्ण आढळले. मागील पाच वर्षात सर्वाधिक डेंगी व चिकूनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत. १ जानेवारी ते १४ सप्टेंबर या कालावधीत ७१७ डेंगीचे तर ५३७ चिकूनगुनियाचे रुग्ण आढळले.

हेही वाचा: नाशिक : पावसाने उघडीप दिल्याने गोदावरीची पाणीपातळी स्थिर

पाच वर्षांतील रुग्णसंख्या (जानेवारी ते सप्टेंबर)
वर्ष डेंगी चिकूनगुनिया
सन २०१७ १५१ ४
सन २०१८ ३६८ ४०
सन २०१९ १७७ १
सन २०२० ११५ ७
सन २०२१ ७१७ ५३७

हेही वाचा: नाशिक शहरात पोलिस परवानगीनंतरच लावता येणार होर्डिंग

loading image
go to top