esakal | नाशिक शहर बससेवा सुसाट! आणखी 2 नव्या मार्गांवर होणार सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik city bus service

नाशिक शहर बससेवा सुसाट! आणखी 2 नव्या मार्गांवर होणार सुरुवात

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शहर बससेवेला वाढता प्रतिसाद लक्षात घेता सिटीलिंक कंपनीने नव्याने दोन मार्ग वाढविले आहे. नाशिक रोड ते कामटवाडा, तसेच नाशिक रोड ते आडगाव मार्गे जत्रा हॉटेलपर्यंत, अशा दोन मार्गांवर नव्याने बससेवा सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रवाशांची दैनंदिन संख्या एकवीस हजारांपर्यंत पोचल्याने सिटीलिंक कंपनीला दिलासा मिळाला आहे.

महापालिकेकडून जुलै महिन्यापासून शहर बससेवा सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यामध्ये बारा मार्गांवर ५१ बस सुरू करण्यात आल्या. त्या मार्गांवर चांगला प्रतिसाद मिळाल्याने १ सप्टेंबरपासून पंचवीस बस वाढविण्याबरोबरच चार नवीन मार्ग सुरू करण्यात आले. सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये फेऱ्या वाढविण्याची मागणी करण्यात आल्याने त्यानुसार त्या मार्गावरदेखील बस सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या शहरात २० मार्गांवर बस धावत आहेत. आता नव्याने द्वारका, आडगावसह कामटवाडा येथून प्रवाशांची मागणी वाढल्याने या दोन मार्गांवर बस सुरू करण्यात येत आहे. सध्या शहर बससेवेने २०००० प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. शासकीय सुटीचे दिवस वगळता दररोज २० ते २१ हजार प्रवासी मिळत असल्याचा दावा सिटीलींक कंपनीकडून करण्यात आला आहे. शहराच्या उपनगरांमधून बससेवा सुरू करण्याची मागणी होत असून जेल रोड, म्हसरुळ, आडगाव, पाथर्डी, गंगापूर या भागातून बससेवा सुरू करण्याची मागणी वाढली आहे. निमा व आयमा या औद्योगिक संघटनांनी औद्योगिक वसाहतीमध्ये बससेवा वाढविण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा: मनसेची एकी कागदावर की प्रत्यक्षात? नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक


असे आहेत दोन नवीन मार्ग

- पहिला मार्ग- नाशिक रोड ते म्हाडा, भाभानगर, सह्याद्री हॉस्पिटल, मुंबई नाका, प्रकाश पेट्रोलपंप, गोविंदनगर, सिटी सेंटर मॉल, उंटवाडी, त्रिमूर्ती चौक, कामटवाडा, डीजीपीनगर २, केवल पार्क.
- दुसरा मार्ग- नाशिक रोड ते आडगाव मार्गे द्वारका, कन्नमवार पूल, पंचवटी कॉलेज, आडगाव नाका, जत्रा हॉटेल.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्या पुन्‍हा नऊशे पार

loading image
go to top