fish net.jpg 
नाशिक

जाळे विणून सुटतेय रोजीरोटी! कोरोना संकटकाळात भगवान मोरेंची ही जिद्द कौतुकास्पदच

दिपक देशमुख

झोडगे (नाशिक) : मासेमारीसाठी लागणारे जाळे विणणारे कारागीर भगवान मोरे मासेमारीसह जाळे विणून तयार जाळ्याची विक्री करून रोजगाराची संधी निर्माण करीत आहे. कोरोना संकटकाळात एकीकडे अनेकांचा रोजगार हिरावला गेला असताना दुसरीकडे मोरे यांची ही जिद्द कौतुकास्पदच म्हणावी लागेल. 

मागील पिढीकडून कला अवगत...

यंदाच्या हंगामात अतिपावसाने अनेक ठिकाणी नदी-नाल्यांसह धरण, तलाव, शेततळे, बंधारे, विहिरींना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने यंदाच्या हंगामात मोठ्या प्रमाणात मासेवाढीसाठी पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच गावतलाव, धरणे, बंधारे, शेततळ्यांमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मत्स्यबीज सोडण्यात आले. अशा ठिकाणी मासेमारीसाठी जाळ्याचा वापर केला जातो. मासेमारी करणारे व्यावसायिक कारखान्यात तयार करण्यात आलेले जाळे खरेदी करून मोठ्या प्रमाणावर मासेमारीसाठी वापरतात, तर पारंपरिक पद्धतीने मासेमारी करून उदरनिर्वाह करणारे व्यावसायिक हाताने विणलेल्या जाळ्याचा वापर करून मासेमारी करतात. मासेमारीसाठी लागणारे जाळे पारंपरिक पद्धतीने विणण्याची कला मागील पिढीकडून अवगत करून जाळे विणले जाते. 

गरजेनुसार जाळे बनविण्याकडे कल... 

मासेमारीसाठी लागणारे जाळे नायलॉन दोरीने बनविले जाते. १२ फूट लांबीचे जाळे बनविण्यासाठी सुमारे पंधराशे रुपये खर्च येतो, तर तयार जाळे दोन हजार ५०० रुपयांपर्यंत विक्री होत असल्याने मासेमारीसह जाळे विक्रीतून रोजगार उपलब्ध होत आहे. मासेमारीसाठी लागणारे जाळे मागणीनुसार लहान-मोठ्या आकाराचे बनवून दिले जात असल्याने गरजेनुसार जाळे बनवून घेण्याकडे व्यावसायिकांचा कल दिसतो.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Loan Waiver: सातारा जिल्ह्यात ५४ हजार खाती कर्जमुक्तीकडे; बॅंकांमधील माहिती पोर्टलवर अपलोड, ५६९.४० कोटी होणार माफ

IND vs ZIM, T20I: 'Vaibhav Sooryavanshi ने चूका सुधारण्यावर लक्ष दिले असेलच, त्यामुळे...' श्रेयस अय्यरचे मोठे विधान

Latest Marathi Update : भाजपकडून बाहेरून गुंड पाठवून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न : अभिजीत दिपके

Auto Rickshaw Driver Killed : गळ्याभोवती नायलॉनची दोरी अन् डोके-चेहऱ्यावर गंभीर घाव! गिरगाव डोंगरात रिक्षा चालकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

Pune News: बारामतीत माणुसकीचे दर्शन! रस्त्यात अपघात पाहताच सुनेत्रा पवार थांबल्या; जखमी तरुणीला तत्काळ रुग्णालयात केलं दाखल

SCROLL FOR NEXT