Fake Documents  esakal
नाशिक

बनावट दस्तऐवजाद्वारे फसवणूक; सात जणांवर गुन्हा दाखल

विनोद बेदरकर

नाशिक : दुसऱ्याच्या नावे असलेल्या शेत जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करून ही जमीन परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये बनावट दस्तऐवज नोटरी (Notary) करणाऱ्या वकिलांसह सहा जणांविरुद्ध देवळाली कॅम्प (Deolali Camp) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित ॲड ए. आय. शेख या वकीलावर दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे.

नाजीम अब्दूल मजीद शेख, तब्बसुम इरफान शेख, अब्दूल मजीद शेख (रा. संसरी नाका, देवळाली कॅम्प), रमेश जाधव, तुकाराम मोरे व अ‍ॅड. ए. आय. शेख (रा. नाशिक रोड), अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी मुंबईस्थित इरफान अब्दुलगनी शेख (मुळ रा. देवळाली कॅम्प) यांनी तक्रार दाखल केली आहे. इरफान शेख यांच्या मालकीची मौजे लहवित येथील सर्व्हे नं १४८ /१/२ मध्ये शेत जमीन आहे. या मिळकतीचे संशयितांनी कट रचून परस्पर विक्री करण्याच्या इराद्याने बनावट दस्तऐवज (Fake Documents) तयार केले. या दस्तऐवजावर अ‍ॅड. ए. आय. शेख यांनी नोटरी केल्याचे म्हटले आहे. याबाबत इरफान शेख यांनी पोलिसांचे उंबरठे झिजविले, मात्र न्याय न मिळाल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून, उपनगर (Upanagar) पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये (IPC section) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गिते करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT