onion import 
नाशिक

केंद्राच्या कांदा आयात धोरणाचा फटका; अभोण्यात कांद्याच्या भावात घसरण

किरण सुर्यवंशी

नाशिक/अभोणा : येथील कृषी उत्पन्न उपबाजार समिती आवारात मंगळवार(ता.20) रोजीच्या तुलनेने गुरुवार (ता.22) रोजी नऊशे ते एक हजार रुपये प्रतिक्विंटल भावात घसरण झाली. उपबाजारात मालाची वाढलेली आवक, केंद्राने परदेशातील कांद्याची केलेली आयात व व्यापाऱ्यांवर आयकर विभागाचे छापे या सर्वांचा परिणाम म्हणजे कांद्याच्या भावात झालेली घसरण.

शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली

एकूण 411 ट्रॅक्टर आवक होती.साधारण सहा हजार क्विंटल मालाची खरेदी झाली.नंबर एक कांद्याला जास्तीतजास्त सात हजार 500 ते आठ हजार 210,नंबर दोन कांद्याला सहा हजार 500 ते सात हजार 500, नंबर तीन कांद्याला पाच हजार 400 ते सहा हजार 500 व खाद कांद्यास एक हजार 300 ते चार हजार रुपये भाव मिळाला.
परतीच्या पावसाने बाजरी, सोयाबीन, मका व काही ठिकाणी साठविलेला कांदा यांचे प्रचंड नुकसान झाले. गेली काही महिने अत्यंत कवडीमोल भावाने शेतकऱ्यांना कांदा विकावा लागला. वाढत्या भावाने थोडीफार नुकसान भरपाई होईल अशी आशा असतानाच, शासनाच्या कांदा आयातीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.

शेतकऱ्यांच्या योग्य मालास योग्य भाव मिळावा हाच कळवण कृषी उत्पन्न बाजार व अभोणा, कनाशी उपबाजार समितीचा प्रामाणिक प्रयत्न आहे.सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या मालाची योग्य प्रतवारी करून कळवण कृषी उत्पन्न बाजार व अभोणा, कनाशी उपबाजार समितीत कांदा विक्रीस आणावा. तसेच माल विक्रीचे पैसे रोखीने घेऊन जावेत. - धनंजय पवार, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, कळवण 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT