esakal | क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश
sakal

बोलून बातमी शोधा

santosh.png

मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना...रेणुकामातेची ज्योत आणयला म्हणून संतोष गेला. मात्र नियतीची खेळी कोणाला कळते. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा असा दुर्देवी अंत, संपूर्ण गावाला हादराच. वाचा नेमके काय घडले?

क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

sakal_logo
By
प्रमोद सावंत

नाशिक : (मालेगाव) मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना...रेणुकामातेची ज्योत आणयला म्हणून संतोष गेला. मात्र नियतीची खेळी कोणाला कळते. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा असा दुर्देवी अंत, संपूर्ण गावाला हादराच. वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

संतोष चैत्राम जाधव (वय २८, रा. गिगाव) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी (ता. १७) सायंकाळी रेणुकामाता, चांदवड येथून देवीची ज्योत आणताना मनमाड चौफुलीजवळ अनोळखी वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर संबंधित वाहनचालक वाहनासह फरारी झाला. गंभीर जखमी संतोषला अत्यवस्थ स्थितीत येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. किल्ला पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तरुणाच्या अपघाती निधनाबद्दल माळमाथा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

परिसरात हळहळ

रेणुकादेवीची ज्योत आणतांना संतोषचा अपघाती मृत्यू झाल्याने परिवारावर शोककळा पसरली. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोषला अनोळखी वाहनाने धडक देऊन पळ काढला. या वाहनचालकाचा तपास सुरू आहे.

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

go to top