sanjay dodke shetkari.jpg 
नाशिक

क्रूर नियती! पत्नी व मुलांच्या डोळ्यासमोरच संजय सोबत घडत होती भयानक घटना..पण ते होते लाचार

ज्योती देवरे

नाशिक / सुरगाणा : शेतात नुकताच नवीन घेतलेल्या ट्रॅक्टरने भात लावणी करीता चिखल तयार करून संजय घरी परत निघाला होता. परिवारातील कर्ता मुलगा म्हणून संजय आपली जबाबदारी चोख पार पाडत होता. पण अशातच त्याच्या सुखी संसाराला कोणीची तरी दृष्ट लागली. आणि सारे होत्याचे नव्हते झाले. एका भयानक घटनेने सारे काही बदलले.

अंगावर काटा आणणारी घटना..

संजय मोतीराम दोडके ( वय.२९) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. काठीपाडा शिवारातील शेतात नुकताच नवीन घेतलेल्या ट्रॅक्टरने भात लावणी करीता चिखल तयार करून संजय घरी परत निघाला होता. गुडघाभर चिखलातून ट्रॅक्टर बाहेर काढून बांधावरुन उतरत असताना ट्रॅक्टर जागीच भाताच्या आवणात पलटी झाला. यावेळी संजय हा ट्रॅक्टरखाली दाबला गेला. मदतीसाठी त्याने आवाज दिला. परिसरातील शेतकरींना घटना समजताच त्यांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले. यादरम्यान संजयचा दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नी व मुलांच्या डोळ्यासमोर ही घटना बुधवारी दुपारनंतर साडेचार वाजेच्या सुमारास घडली. त्याच्या अकस्मात मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

अकस्मात मृत्यूने हळहळ व्यक्त

संजयच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व आई, वडील असा परिवार आहे. पोलीस पाटील सिताराम चौधरी यांनी पोलीसांना खबर दिली. पोलीसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर नांद्रे व पोलीस हवालदार चंद्रकांत दवंगे करीतआहेत. भात लागवडीसाठी चिखल तयार करून घराकडे परतत असताना ट्रॅक्टरवरील ताबा सुटून पलटी झाल्याने त्याखाली दबून युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील काठीपाडा येथे घडली.

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT