झोळीत असतानाच नियतीने हिरावले पितृछत्र...आज त्याच लेकीच्या यशाने माऊलीच्या होते डोळ्यात आनंदाश्रू

दिपक देशमुख
Wednesday, 29 July 2020

स्नेहल ही लहानपणी झोळीत असताना वडिलांचे अपघाती निधन झाले. वडील विनाअनुदानित महाविद्यालयात प्राध्यापक होते. पण नियतीने घाला घातला आणि स्नेहलचे पितृछत्र हरपले. पण आई, आजोबा, काका यांच्या मार्गदर्शनात स्नेहलने शिक्षण पुढे चालू ठेवले.

नाशिक / झोडगे : स्नेहल ही लहानपणी झोळीत असताना वडिलांचे अपघाती निधन झाले. वडील विनाअनुदानित महाविद्यालयात प्राध्यापक होते. पण नियतीने घाला घातला आणि स्नेहलचे पितृछत्र हरपले. पण आई, आजोबा, काका यांच्या मार्गदर्शनात स्नेहलने शिक्षण पुढे चालू ठेवले. 

स्नेहल कष्टाचे चीज

चिखलओहोळ येथील ना. स. देशमुख विद्यालयात स्नेहल गोलाईत हिने दहावीच्या परीक्षेत ९४.४० टक्के मिळवून आईच्या कष्टाचे चीज केले. स्नेहलला वैद्यकीय शिक्षण घेऊन ग्रामीण भागातील जनतेसाठी आरोग्यसेवा करण्याची इच्छा आहे. स्नेहल ही लहानपणी झोळीत असताना वडिलांचे अपघाती निधन झाले. वडील विनाअनुदानित महाविद्यालयात प्राध्यापक होते. पण नियतीने घाला घातला आणि स्नेहलचे पितृछत्र हरपले. पण आई, आजोबा, काका यांच्या मार्गदर्शनात स्नेहलने शिक्षण पुढे चालू ठेवले. मुळात शांत व अबोल स्वभाव असलेली स्नेहल हिला वाचनाची आवड आहे. घरची परिस्थिती बेताची याची परिपूर्ण जाणीव होती. शेतातील घर ते शाळा अशी दोन किलोमीटरची दररोज पायपीट करून स्नेहलने आपले शिक्षण पूर्ण केले.

हेही वाचा > संपूर्ण गाव हादरले! विहीरीत तरंगणारी 'ती' गोष्ट पाहिली.. खुलासा होताच कुटुंबियांचा आक्रोश

स्वप्न आज पूर्ण झाल्याचे आनंदाश्रू

आपली जिद्द, शाळेत प्रथम येण्याची धडपड हे स्वप्न आज पूर्ण झाल्याचे आनंदाश्रू तिच्या आईच्या व कुटुंबातील सदस्यांना डोळ्यात दिसले. स्नेहलने विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. तिच्या यशाबद्दल संस्थेचे देशमुख, अध्यक्ष संदीपराव देशमुख यांनी तिच्या पुढील शिक्षणासाठी कोणतीही अडचण आल्यास आपण सदैव मदतीस तयार असल्याचे सांगितले. तिची जिद्द व चिकाटीने यश संपादन केल्याचे मुख्याध्यापक हंसराज देसाई यांनी सांगितले. तिच्या यशाबद्दल शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी पर्यवेक्षक व्ही. एम. दापूरकर, सर्व शिक्षक, कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या.  

रिपोर्ट - दिपक देशमुख

संपादन - ज्योती देवरे
 

हेही वाचा > एक होती तान्हुल्याच्या काळजीपोटी गड उतरणारी हिरकणी..अन् एक 'ही'..! घराघरात चर्चा..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: snehal golait success in ssc board exam zodge nashik marathi news