labhde farmer suicide.jpg 
नाशिक

"कुऱ्हाड द्राक्षबागेवर नाही..तर नशिबावर फिरवली.." बळीराजाचा अखेर धीर सुटलाच

योगेश मेधणे

नाशिक / चिंचखेड : गेल्या चार वर्षांपासून शेतातील सततची नापिकी तसेच द्राक्ष बागेत कोणतेही उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी द्राक्षबागेवर कुऱ्हाड  लावली होती. पण खरी कुऱ्हाड तर दत्तात्रय लभडे यांच्या नशिबावर फिरली होती. वाचा चिंचखेड येथे घडलेला दुर्दैवी प्रकार

पण खरी कुऱ्हाड तर दत्तात्रय लभडे यांच्या नशिबावर फिरली

चिंचखेड येथील रहिवासी तसेच अल्पभूधारक शेतकरी दत्तात्रय लभडे यांच्यावर देना बँकेचे नऊ लाख रुपये कर्ज आणि चिंचखेड विविध कार्यकारी सोसायटीचे दोन लाख रुपये कर्ज होते. मध्यंतरी त्यांचे वडील विहिरीत पडल्यामुळे डोक्याला मार लागला असल्याने त्यांचे वडील कोणतेही काम करू शकत नव्हते त्यामुळे घरची सर्वस्व जबाबदारी दत्तात्रय लभडे यांच्यावर आली, त्यानंतर गेल्या चार वर्षांपासून शेतातील सततची नापिकी तसेच  द्राक्ष बागेत कोणतेही उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी द्राक्षबागेवर कुर्हाड लावली होती. उत्पन्नाचे कोणतेही पर्याय खुले दिसत नसल्याने नैराश्यातून  गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसताना दत्तात्रय लभडे यांनी घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी,दोन मुले, सून भाऊ,असा परिवार आहे.

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्यानी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दत्तात्रय बाबुराव लभडे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून ते 51 वर्षांचे होते.

रिपोर्ट - योगेश मेधणे

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला वेग; पुणे विभागातील चार जिल्ह्यांत ६२०० हेक्टर जमीन संपादित होणार

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

SCROLL FOR NEXT