Vijay Patkar and actors acting during the shooting of the film 'Ekdam Pakka-Bhaucha Chakta' near Shivsmarka in Deola.
Vijay Patkar and actors acting during the shooting of the film 'Ekdam Pakka-Bhaucha Chakta' near Shivsmarka in Deola. esakal
नाशिक

Nashik News: देवळ्यात ‘एकदम पक्का-भाऊचा धक्का’चे चित्रीकरण! मध्यवर्ती ठिकाणी असलेले शिवस्मारक ठरतेय आकर्षण

सकाळ वृत्तसेवा

देवळा : येथील शिवस्मारकाजवळ संजय पाटील दिग्दर्शित ‘एकदम पक्का-भाऊचा धक्का’ या चित्रपटाचे चित्रीकरण शनिवारी (ता. ७) झाले.

टेक... रोल... ॲक्शन.... चा आवाज, कलाकारांचा अभिनय आणि प्रेक्षकांची गर्दी यामुळे हा भाग फुलून गेला होता. विजय पाटकरसह इतर कलाकार आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. (Filming of Ekdam Pakka Bhau Cha dhakka in deola central attraction chhatrapati shivaji maharaj memorial Nashik News)

देवळा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवस्मारक उभे राहिले आहे.

गडकिल्ल्यांच्या रूपातील चौथरा, त्यावर भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, चौथऱ्याभोवती ठेवलेल्या तोफांच्या प्रतिकृती, मावळ्यांची व इतर गजशिल्पे तसेच मोकळ्या जागेत केलेली सुंदर रचना, रस्त्यावर केलेली आकर्षकता यामुळे हे शिवतीर्थ मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांच्या व कलाकारांच्या पसंतीस उतरत आहे.

शैक्षणिक जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात भारत गणेशपुरे, आनंद जोग यांच्यासह मराठी मालिकांमधील दहा नायिका भूमिका साकारत आहेत.

दहावी-बारावीनंतर मुलांना महागडे क्लासेस लावावे लागतात. या पार्श्वभूमीवर मोठ्या हुद्द्यावर असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना राबवण्याचा एक प्रेरक संदेश या चित्रपटातून दिला जाणार आहे.

गीतकार मोमीन कवठेकर व दीपक गायकवाड यांच्या ‘मराठमोळा रे कणखर काळा रे- शिवबांचा हाय ह्यो मावळा मावळा’ याही गाण्याचे चित्रीकरण या वेळी झाले.

एसकेडी इंटरनॅशनल स्कूल, डॉ. डी. एस. आहेर पब्लिक स्कूल तसेच किशोरसागर धरणाच्या परिसरातही चित्रीकरण होणार आहे. देवळा शहर व तालुक्यात प्रथमच असे चित्रीकरण होत असल्याने तो औत्सुक्याचा विषय ठरला आहे. अनेकांनी कलाकारांसमवेत सेल्फी, फोटो घेतले.

"देवळा शहराचा परिसर, शिवस्मारक व त्याभोवतीचे वातावरण या साऱ्याच गोष्टी चित्रपटासाठी अनुकूल वाटल्याने आम्ही हे लोकेशन निवडले. लातूर, तुळजापूर, शिर्डी आणि आता देवळा या ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून, लवकरच हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे."-संजय पाटील, निर्माता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT