Fire due to rocket landing in gallery nashik fire accident esakal
नाशिक

Nashik Fire Accident: गॅलरीत रॉकेट पडल्याने आग; भाऊबीजेला आलेल्या बहिणीचे कपडे व लॅपटॉप जळाले

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fire Accident : भाऊबीजेच्या दिवशी खुटवडनगरला रात्री घराच्या गॅलरीत रॉकेट पडल्याने लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. यात भाऊबीजेला आलेल्या बहिणीचे कपडे लॅपटॉप तसेच दिवाळी सणाचे नवीन कपडे व घरागुती साहित्य जळून खाक झाले. (Fire due to rocket landing in gallery nashik fire accident)

खुटवडनगर पोलीस चौकी शेजारील सुरेश बापू प्लाझा इमारतीतील शैलेश सुंदरम हे सात नंबर या फ्लॅट मध्ये राहतात. त्यांच्याकडे दिपावली सणापासून त्यांच्या बहिणीसह कुटुंब परिवार आले होते.

भाऊबीजेची ओवाळणी करून सुंदरम व पाहुणे बाहेर फिरायला गेले होते. या वेळी रात्री १० वाजेच्या सुमारास बाहेरून एक फटाक्याचे राॅकेट गॅलेरीत आत आले. यात गॅलरीत ठेवण्यात आलेले बहिणीचे नवीन साड्या दोन लॅपटॉप तसेच दिवाळीतील नवीन कपडे तसेच सोपा पलंग व गाद्या जळून खाक झाले.

आग लागल्यानंतर घटनेची माहिती नागरिकांनी सातपूर अग्निशामन दलाला दिली. अग्निशामक दलाचे कर्मचारी पी.बी परदेशी, एस .आर .जाधव, ए .पी .मोरे, उन्हाळे व सहकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

एक तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. तर इमारती मधील नागरिकांनी घटनेची माहिती सुंदरम यांना दिली. तसेच इमारतीतील नागरिकांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व घरातील वस्तु बाहेर काढल्याने होणारे नुकसान वाचविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT