education Medical admission  esakal
नाशिक

AYUSH Course Admission : आयुष अभ्यासक्रमांची पहिली निवड यादी उद्या होणार जाहीर; जाणून घ्या वेळापत्रक

सकाळ वृत्तसेवा

AYUSH Course Admission : व्‍यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झालेली असली, तरी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया विविध टप्प्‍यांवर सुरू आहे.

एमबीबीएस आणि बीडीएस या अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी तिसऱ्या कॅप राउंडकरिता प्राधान्‍यक्रम नोंदविण्याची गुरुवार (ता. १४)पर्यंत मुदत असणार आहे. याच दिवशी आयुष अभ्यासक्रमांच्‍या राज्‍यस्तरावरील जागांची पहिली निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. (first selection list of AYUSH courses will be announced tomorrow nashik news)

नॅशनल टेस्‍टिंग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यामार्फत घेतलेल्‍या नीट २०२३ परीक्षेच्‍या माध्यमातून वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जात आहे. यापूर्वी एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्‍या दोन प्रवेश फेऱ्या पूर्ण झालेल्‍या आहेत. सध्या तिसऱ्या कॅप राउंडची प्रक्रिया सुरू आहे.

पात्र असलेल्‍या विद्यार्थ्यांना प्राधान्‍यक्रम नोंदविण्यासाठी मुदत बुधवार (ता. १३) आणि गुरुवार अशी दोन दिवस असेल. या फेरीची निवड यादी शुक्रवारी (ता. १५) प्रसिद्ध केली जाईल. विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी १६ ते २० सप्‍टेंबर अशी मुदत दिली जाणार आहे. दुसरीकडे आयुष अभ्यासक्रमांच्‍या पहिल्‍या कॅप राउंडसाठी पर्याय नोंदविण्याची मुदत संपली असून, आता विद्यार्थ्यांना निवड यादीची प्रतीक्षा लागून आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आयुष अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाला गती

राज्‍यस्‍तरीय ८५ टक्‍के जागांवर प्रवेशासाठी सुरू असलेल्‍या प्रक्रियेत आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस) आणि युनानी (बीयूएमएस) यांसह फिजिओथेरपीसह अन्‍य शिक्षणक्रमांना या प्रवेशप्रक्रियेतून प्रवेश दिले जाणार आहेत. पहिल्‍या फेरीची निवड यादी गुरुवारी (ता. १४) प्रसिद्ध केली जाणार असून, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १५ ते २० सप्‍टेंबर अशी मुदत दिली जाईल.

आयुष अभ्यासक्रमांचे प्रवेश वेळापत्रक असे ः

* दुसऱ्या कॅप राउंडसाठी पर्याय नोंदविणे-------१ ते ३ ऑक्‍टोबर

* दुसऱ्या कॅप राउंडची निवड यादी प्रसिद्धी----५ ऑक्‍टोबर

* निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश मुदत----६ ते १० ऑक्‍टोबर

* तिसऱ्या कॅप राउंडमध्ये सहभागासाठी नोंदणी-------२०, २१ ऑक्‍टोबर

* तिसऱ्या कॅप राउंडसाठी पर्याय नोंदविणे-----------२३, २४ ऑक्‍टोबर

* या फेरीसाठी निवड यादीची प्रसिद्धी-------------२६ ऑक्‍टोबर

* विद्यार्थ्यांना प्रवेशनिश्‍चितीची मुदत------------२७ ते ३० ऑक्‍टोबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT