Nashik Fraud Doctor : जिल्ह्यात महिनाभरात सापडले चार मुन्नाभाई; बनावट डॉक्टरांविरोधात कारवाईचा बडगा

fraud doctor
fraud doctorsakal

Nashik Fraud Doctor : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात बनावट डॉक्टरांचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. जिल्ह्यातील दोन वर्षांतील तब्बल ३१ बनावट डॉक्टरांवरील कारवाई प्रतीक्षेत असताना गत महिनाभरात चार बनावट डॉक्टर गावात सर्रासपणे प्रॅक्टिस करताना सापडले आहेत.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांत चार बनावट डॉक्टर आढळले असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य प्रशासनाने दिली. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मात्र, यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य धोक्यात आले आहे.

बनावट डॉक्टर ग्रामीण भागात तसेच शहरातील झोपडपट्टी परिसरात दवाखाने थाटून बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. (4 fraud doctors were found in district within month nashik fraud crime news)

गोरगरिबांना तज्ज्ञ डॉक्टरांची फी परवडत नाही. बनावट डॉक्टरांची फी कमी असल्याने रुग्ण उपचारांसाठी या डॉक्टरांकडे जातात.

हा डॉक्टर बनावट असल्याचे रुग्णांनाही कळत नाही. शिवाय, रुग्णही डॉक्टरांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी जास्त चौकशी करीत नाहीत. आरोग्य विभागाकडून शहरातील तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक डॉक्टरकडे चौकशी होत नसल्याने वर्षानुवर्षे बनावट डॉक्टर उघडपणे व्यवसाय करीत असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात बनावट डॉक्टरांची मोठी डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. ‘बनावट डॉक्टरमुक्त’ जिल्हा करण्यासाठी आरोग्य विभागाकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. परिणामी, जिल्ह्यात अधूनमधून बनावट डॉक्टर सापडतात. तीन दिवसांपूर्वी जातेगाव (ता. नांदगाव) येथे एक बनावट डॉक्टर असल्याची तक्रार प्रशासनाला प्राप्त झाली होती.

त्यानुसार तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार यांनी चौकशी करीत संबंधित बनावट डॉक्टरला पोलिसांच्या ताब्यात देत गुन्हा दाखल केला आहे. आलोककुमार विश्वास असे या बनावट डॉक्टरचे नाव आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

fraud doctor
Fraud Doctors : आदिवासी भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; आरोग्य विभागाचे सोईस्कर दुर्लक्ष

गेल्या महिन्यात २३ ऑगस्टला दळवट (ता. कळवण) गावात विकी जाधवनामक डॉक्टर बेकायदेशीरपणे प्रॅक्टिस करीत असल्याचे समोर आले होते. नांदगाव तालुक्यातील राजेंद्र विसपुतेनामक बनावट डॉक्टरवर १४ ऑगस्टला कारवाई करण्यात आली होती. ८ जुलैला साखसंद खैरनारनामक सटाणा येथील बनावट डॉक्टरवर कारवाई करण्यात आलेली आहे.

कारवाईकरिता अशी आहे समिती

बनावट डॉक्टरांच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षांसह त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. समितीत तालुका आरोग्य अधिकारी हे सदस्य सचिव असून, जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी (आरोग्य) हे सदस्य आहेत.

ज्या नागरिकांना बनावट डॉक्टरबाबत संशय येतो, त्यांच्यामार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात येते. ही तक्रार प्राप्त झाल्यावर तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे वर्ग करून त्यावर काय कारवाई केली, याबाबतचा अहवाल मागवला जातो. याबाबत बनावट डॉक्टरांवर कारवाई करण्याचे अधिकार या समितीला देण्यात आलेले आहेत.

"वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना आरोग्य सेवा देणे चुकीचे आहे. बनावट डॉक्टरांबाबत प्रशासनाला तक्रार प्राप्त झाल्यावर लगेचच त्याबाबत चौकशी केली जाते. संबंधितांचे परवाने, कागदपत्रे तपासली जातात. आक्षेपार्ह काही आढळल्यास लगेचच कारवाई केली जात आहे." - डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद

fraud doctor
Jalgaon Fraud Doctor : बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू; घटनेनंतर ‘मुन्नाभाई’ डॉक्टर गावातून पसार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com