DJ File Photo esakal
नाशिक

Ganeshotsav 2023: आजपासून 3 दिवस दणदणाट! गणेशोत्सव शिगेला; पोलिसांकडून ध्वनीमर्यादेची मोजमाप

सकाळ वृत्तसेवा

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांना रात्री उशिरापर्यंत देखावे पाहता यावेत यासाठी अखेरचे चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत गणेश मंडळांना आरास व देखावे खुले ठेवण्यास पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे.

एरवी रात्री १० वाजेनंतर देखाव्यांसह ध्वनीक्षेपकांवरही बंदी असते. मात्र पुढील तीन दिवस मध्यरात्रीपर्यंत भाविकांना देखावे पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे.

मात्र, त्याचवेळी संगीतावर आधारित देखावे पाहताना डीजे वा ध्वनीक्षेपकांच्या ध्वनीवरही मर्यादा राखावी लागणार आहे. ध्वनी मर्यादेचा भंग झाल्यास पोलिसांकडून यशावकाश गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. (Ganeshotsav 2023 3 days of bang from today Ganesha Festival begins Measurement of noise level by police nashik)

वर्षभरातील काही दिवस सार्वजनिक उत्सवाच्या काळात मध्यरात्री पर्यंतची मर्यादा शिथिल करण्यात येते. त्यानुसार गणेशोत्सवातील शेवटचे चार दिवस शिथिलता देण्यात आली आहे. यात अखेरच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचाही समावेश आहे.

त्यामुळे शहर-जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेले देखावे मध्यरात्रीपर्यंत पाहण्याची संधी भाविकांना मिळते. तसेच, उपहारगृहही मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळालेली आहे.

त्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत उद्यापासून तीन दिवस दणदणाट असणार आहे. विशेषत: संगीतावर आधारित लाईटिंगचा झगमगाट पाहण्यासाठी तरुणाई उत्साही असते. एरवी रात्री दहा वाजेपर्यंतची मर्यादा असल्याने बहुतांश नागरिक घराबाहेर पडणे टाळतात.

परंतु हीच मर्यादा मध्यरात्रीपर्यंत केल्याने देखावे पाहण्यासाठीही भाविकांची गर्दी होण्याची शक्‍यता आहे. तर शेवटच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे वाजविण्यावर बंदी घातली आहे.

त्याऐवजी पारंपारिक वाद्य वाजविण्यावर मंडळांनी भर दिला आहे. मात्र रात्री बाराच्या ठोक्‍याला सारेच बंद करावे लागणार आहे.

ध्वनी मर्यादेकडे नजर

सार्वजनिक गणेश मंडळांकडून भाविकांना आकर्षित करण्यासाठी देखावे उभारले जातात. काही प्रबोधनात्मक तर काही डीजेचे संगीत अन्‌ लायटिंगचा मिलाप असतो. अशाच देखाव्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

रात्रीच्या वेळी शांतता क्षेत्रात ४० तर निवासी क्षेत्रात ४५ डेसीबल ध्वनी मर्यादेची क्षमता आहे. या ध्वनीमर्यादेचे उल्लंघन झाल्यास त्या मंडळांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे.

सदरचे डेसीबलची मोजमाप करण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून पोलिस ठाण्यांना यंत्र पुरविण्यात आले असून, ध्वनीचे मोजमाप केली जात आहे.

"गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीसह शेवटचे चार दिवस मध्यरात्री बारा वाजेपर्यंत देखावे, आरास पाहण्यास परवानगी आहे. त्यादृष्टीने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच, ध्वनीक्षेपकांच्या ध्वनीचे डेसिबल पोलिस ठाणेनिहाय मोजले जाणार आहे. मर्यादा ओलंडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल."- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हेशाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: काँग्रेसने विधेयकाची भ्रूणहत्या केली, पापाची शिक्षा नक्की मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला संबोधन

SRH vs CSK Live: अभिषेक शर्माला 'चिटींग' करायची होती, पण संजू सॅमसनने चोरी पकडली; IPL 2026 मध्ये आणखी एक ड्रामा, Video

IPL 2026 News: विराट कोहलीच्या stunning catch वर व्हायरल होतेय अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन; Video

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

Latest Marathi News Live Update: - नेस्को ड्रग्स प्रकरणातील पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT