Shahaji Umap esakal
नाशिक

Ganeshotsav 2023: नाशिक ग्रामीण पोलीसांतर्फे उत्कृष्ट गणेश मंडळांना पारितोषिके

दिगंबर पाटोळे

Ganeshotsav 2023 : नाशिक ग्रामिण पोलिस अंतर्गत उत्कृष्ट गणेश मंडळांसाठी नाशिक ग्रामिण पोलिसांच्यावतीने ग्रामिण पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर गणराया अवार्ड पारीतोषीक योजना जाहिर केली आहे. (Ganeshotsav 2023 Awards to best Ganesha Mandals by Nashik Rural Police)

नाशिक ग्रामीण पोलीस अंतर्गत यावर्षी एकूण ३४४१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

आपल्या मौलिक कामगिरीच्या बळावर जिल्ह्याच्या सामाजिक जडणघडणीमध्ये सकारात्मक भर घालणा-या गणेश मंडळांचा सन्मान व्हावा या दृष्टीकोनातून, नाशिक ग्रामीण पोलीसांनी अशा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गणेश मंडळांना विविध पारितोषिके देऊन सन्मानित करण्याचे नियोजन केले आहे.

याकामी प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळाचे परीक्षण करण्यासाठी एक परीक्षण समिती गठित करण्यात येईल. अशी समिती त्या-त्या पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व परवानाधारक सार्वजनिक गणेश मंडळांचे परीक्षण करणार आहे.

यात १) उत्कृष्ट गणेश मूर्ती, २) उत्कृष्ट आरास / देखावा, ३) राबविलेले समाजोपयोगी कार्यक्रम, ४) पोलीसांचे पाळलेले निर्देश, ५) विसर्जन मिरवणूक शिस्तबद्धता या पाच मुद्यांनूसार प्रत्येक पोलीस स्टेशन मधून एका गणेश मंडळाची निवड करण्यात येईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याचप्रमाणे वरील पाचही प्रकारात सर्वोत्कृष्ट ठरणा-या एका गणेश मंडळास संबंधीत पोलीस स्टेशनचे पातळीवरील गणराया अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येईल. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांचे कडून सन्मानपत्र व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.

त्याचप्रमाणे प्रत्येक पोलीस ठाणे पातळीवर सर्वोत्तम ठरलेल्या गणेश मंडळांचे परीक्षण जिल्हा पातळीवरील परीक्षण समिती करेल व त्यातून एकूण पाच मंडळांची जिल्हा पातळीवरील पारितोषिकांसाठी निवड करण्यात येईल. यात सर्वोत्तम ठरणाऱ्या गणेश मंडळास जिल्हा गणराया अवॉर्ड (नाशिक ग्रामीण ) देऊन सन्मानित करण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी ध्वनी मर्यादेचे उल्लंघन टाळून पोलीसांनी वेळोवेळी दिलेले निर्देश पाळावेत व विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवून समाजाच्या सकारात्मक जडणघडणीस आपला हातभार लावावा असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT