Ganeshotsav : फुले व वेलींची गौराई पूजण्याची अनोखी परंपरा,निसर्गपूजेची शिकवण देणारे गौरीपूजन

पावसाळ्यात अनेक औषधी वनस्पतींसोबतच विषारी वेलीही सापडतात.
mumbai
mumbai sakal

मुरबाड - विविध गावांत गौरीपूजनाच्या अनेक पारंपरिक पद्धती प्रचलित आहेत. मुरबाडमध्ये सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या गावांत नैसर्गिक साधने वापरून गौरीपूजा केली जाते. फुले आणि वेलींनी सजवलेल्या गौरींचे पूजन केले जाते. गुरुवारी (ता. २१) गौरी पूजनाचा मुहूर्त असल्याने मुरबाड शहरात गौरीसाठी लागणारी फुले विक्रीसाठी आली आहेत

सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्याशी मुरबाड तालुक्यातील अनेक गावे वसलेली आहेत. पावसाळ्यात अनेक औषधी वनस्पतींसोबतच विषारी वेलीही सापडतात. या उत्सवाच्या माध्यमातून या वनस्पतींची माहिती करून दिली जाते. गौराई वेलीफुलांची बनवून तिला बांबूपासून बनवलेल्या टोपलीत विराजमान केले जाते. गौरीचे दागिने हे ताडाच्या पानांपासून बनवले जातात. तर सुगड भरण्यासाठी तांदूळ वापरले जातात. गौरीचे प्रतीक म्हणून कलईची वेल व फुले, शेंदुर्लीची फुले, रानकांद व तेलपाटाच्या वेली, दिंड्याच्या पानामध्ये गुंडाळून ती टोपलीत ठेवली

जातात आणि त्यांची पूजा केली जाते.लाल पिवळी कलईची फुले ही दिसायला अत्यंत सुंदर व आकर्षक असतात. या वेलीची मुळी अत्यंत विषारी असते. त्यामुळे रानातून भाजी आणताना या वनस्पतीला हात लावू नये, याबाबत या पूजनाच्या माध्यमातून माहिती दिली जाते. रानकंदाचा उपयोग पौष्टिक आहार म्हणून केला जातो. तेलपटाच्या वेलीची पाने व फुलांचा (गाभोळी ) भाजीसाठी उपयोग केला जातो. तिसऱ्या दिवशी दुपारी गौराईला घराच्या पोटमाळ्यावर ठेवले जाते. नंतर तिची आरती करून शेतात नैसर्गिकरीत्या विसर्जन केले जाते. या प्रथेतून एकप्रकारे इकोफ्रेंडली उत्सवाचीच शिकवण देण्यात येते.

mumbai
Satara : बेडगच्या लाँग मार्चमधील चौघांची प्रकृती खालावली

संध्याकाळी आगमन

सर्वसाधारण देवदेवतांच्या पूजेवेळी त्यांचे आगमन सकाळी होते. गौराई देवीचे आगमन आणि पूजा संध्याकाळी होते. वेलफुलांची सामग्री आगोदरच आणून ती घराच्या परसदारातील झाडांवर ठेवली जाते. सायंकाळी ही सामग्री एका टोपलीत ठेवून ती टोपली लहान मुलाच्या डोक्यावर ठेवली जाते. घराच्या मुख्य दरवाज्यात हा मुलगा ती टोपली घेऊन उभा राहतो. (या लहान मुलाला ‘मुलारी’ असे संबोधले जाते.) घराच्या उंबऱ्यात मुलऱ्याचे पाय धुऊन त्याचे व गौराईचे औक्षण केले जाते. नंतर तेथे ठेवलेल्या लाकडी पाटावरील सुगडावर तांब्याचे तपेले ठेवले जाते.

mumbai
Pune News : पत्नीच्या दुसऱ्या लग्नासाठी पतीची माघार

गौर चालवणे म्हणजे काय?

गौराईचे आगमन झाल्यावर घरामध्ये तांबड्या मातीचे पट्टे आखले जातात. या पट्ट्यांवर हळद-कुंकवाच्या हाताच्या मुठीचे ठसे व बोटांचे छाप उठवून (गौराईची पावले ) गौराईचा पाट या पट्ट्यांवरून घरातील प्रत्येक खोलीत नेला जातो व नंतर देवघराच्या खोलीत स्थापना केली जाते. याला गौर चालविणे असे म्हटले जाते.

mumbai
Sangali : बाजार समित्यांची अंतिम मतदार यादी उद्या

नैवेद्याचा खास बेत पहिल्या दिवशी जेवणात तांदळाची खीर आणि पुरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी चहा व तांदळाच्या घावण्याचा नाश्ता दिला जातो. दुपारी जेवणात मिरगुंडी, भजी, आळू वडी, तांदळाचे पीठ दूध व गुळ यापासून बनवलेली ढेबरी असा बेत केला जातो. मध्यरात्री १२ वाजता गौरीची पूजा करून चहा व तांदळाच्या पिठापासून बनविलेल्या पापड्यांचा नैवेद्य दाखवला जातो. विसर्जनाच्या दिवशी जेवणात माठाच्या पालेभाजीचा समावेश असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com