nashik court esakal
नाशिक

गॅंगस्टर रवी पुजारीला पोलिस कोठडी; नाशिक न्यायालयाने सुनावला निर्णय

नाशिक न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली

विनोद बेदरकर

नाशिक : खंडणी आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात मुंबईतील गँगस्टर रवी पुजारी यास नाशिक न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. २०११ मध्ये पाथर्डी फाटा येथील एका बांधकाम साईट्सवर पुजारी टोळीतील चार आरोपींनी गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

नाशिक न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली

मुंबई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सोपान निघोट यांनी मोहनानी खंडणी प्रकरणी रवी पुजारीला शुक्रवारी (ता.२३) विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश गणेश देशमुख यांच्यासमोर हजर केले. मोहनानी यांना रवी पुजारी परदेशातून कॉल करून खंडणी मागत होता. हे कॉल रेकार्ड असून, आवाजाचे नमुने तपासणे, हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे कोठून आली, हल्ल्याच्या योजनेसाठी पैसे कसे उभे राहिले अशा विविध दहा ते बारा कारणांसाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील ॲड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी केली. ही मागणी मान्य करीत न्यायालयाने पुजारीला २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon India 2026 : मान्सूनने देश व्यापला ! मुंबईत २७ वर्षांचा विक्रम मोडीत, अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

RBI चा मोठा निर्णय! SMS अलर्ट आता मोफत; बँका ग्राहकांकडून शुल्क आकारू शकणार नाहीत

FDA Action in Sangli : तुकाराम मुंढेंचा दणका! सांगलीकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या 27 हॉटेल्सना बजावल्या नोटिसा; 3 हॉटेल, एका बेकरीचा परवाना निलंबित

Marathi News Live Updates: बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर संकट; बियाणं उगवलंच नाही

IND vs ENG: संजू सॅमसन in तर दोन खेळडू out! चौथ्या T20I साठी भारतीय संघाची कशी असेल Playing XI

SCROLL FOR NEXT