esakal | असे घडले मृत्यूतांडव! नाशिक ऑक्सिजन गळतीची घटना cctv मध्ये कैद; पाहा VIDEO

बोलून बातमी शोधा

nashik oxygen leak
असे घडले मृत्यूतांडव! नाशिक ऑक्सिजन गळतीची घटना cctv मध्ये कैद; पाहा VIDEO
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : महापालिका, शासन स्तरावर यंत्रणा असतानाही डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात घटना घडली, प्रशासकीय व्यवस्थेच्या त्रुटींमुळेच दुर्घटना घडून त्यात नाहक गोरगरीब २२ जणांचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र अनेकांचे जीव घेणारी ही जीवघेणी घटना घडली तरी कशी...ही संपूर्ण घटना हॉस्पीटलच्या cctv मध्ये कैद झाली आहे. पाहा कसा घडला मृत्यूतांडव

अर्धा तासात आटोपला खेळ

घटना घडल्यानंतर पळापळ सुरू झाली, त्या वेळी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. नितीन रावते यांचा मोबाईल ‘स्वीच ऑफ’ होता. रुग्णालयाचे इतर प्रमुख अधिकारी घटनास्थळी नव्हते. आयुक्त कैलास जाधवदेखील दोन तासांनी घटनास्थळी पोचले. नर्सेस, वॉर्डबॉय यांच्या भरवशावर रुग्णालयाचा कारभार चालत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले. घटना घडल्यानंतर नोडल अधिकऱ्यांची भूमिका महत्त्वाची होती. तेच जागेवर नसल्याने पालिकेच्या रुग्णालयांचा कारभार ‘रामभरोसे’ असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. अर्धा तासात ऑक्सिजन पुरवठा योग्य रीतीने होण्याबरोबरच तणावाची स्थिती योग्य रितीने हाताळली असती तर काही प्रमाणात का होईना जीवितहानी टाळता आली असती.

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती : संशय बळावला! ऑक्सिजन ठेकेदार कंपनीचा लागेना थांगपत्ता

आपत्ती व्यवस्थापनाचा कारभार समोर

डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा ऑक्सिजन कमी झाल्याने नाहक २२ जणांचा बळी गेल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाचा कारभार समोर आला आहे. घटनेच्या निमित्ताने काही प्रश्‍न निर्माण झाले आहेत. ते असे, ज्या वेळी ऑक्सिजन गळती झाली, त्या वेळी रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नव्हती, नगरसेवकांकडून पोर्टेबल ऑक्सिजन अर्थात, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरच्या माध्यमातून रुग्णांना सेवा दिली जात आहे. त्या माध्यमातून तात्पुरता का होईना ऑक्सिजनचा पुरवठा होऊन रुग्णांचा जीव वाचला असता. शहरात भविष्यात उत्तुंग इमारती होणार म्हणून आठ ते दहा कोटी रुपयांची शिडी खरेदी करण्यात आली आहे. मात्र, ऑक्सिजन प्लांट नादुरुस्त झाल्यानंतर रुग्णांना ऑक्सिजन देण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने खर्चाच्या विषयांकडे प्रशासनाचे लक्ष असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले. घरामध्ये एक सिलिंडर संपल्यानतर तातडीची गरज म्हणून दुसरे सिलिंडर असते किंवा किमान स्टोव्ह, इलेक्ट्रिक शेगडी असते. हा साधा उपाय घरामध्ये होत असेल, तर जेथे रुग्णांच्या जिवाचा प्रश्‍न आहे तेथे ऑक्सिजनची तात्पुरती व्यवस्था का केली गेली नाही, असा प्रश्‍न निर्माण होत असल्याने महापालिका आयुक्त, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी जबाबदार असून, नाशिक शहरात आपत्ती व्यवस्थापन फोल ठरल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : उच्चस्तरीय चौकशी समितीत कोण कोण असणार?

एक महिन्यातच तुटला पाइप

पुणे येथील टायो निप्पॉन सन्सो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दहा वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीचे काम देण्यात आले होते. ऑक्सिजन प्लॅन्ट सुरु होऊन दोनच महिने झाले असताना टाकीचा पाइप तुटल्याने निकृष्ट दर्जाचे साहित्य बसविले गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटना घडली त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी मेन व्हॉल्व बंद केल्याने कंपनीचे तंत्रज्ञ कुठे होते असा सवाल उपस्थित केला जात आहे.