ration shop 1.jpg 
नाशिक

CoronaFighters : कशासाठी पोटासाठी, सामाजिक भान जपण्यासाठी! कोरोना लढ्यात त्यांचा मोलाचा वाटा 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलिस आणि डॉक्‍टर सतत लढा देत आहेत. शिवाय अत्यावश्‍यक सेवेत मोडणारे किरणा दुकान, स्वस्त धान्य दुकानदारांचा मोठा वाटा आहे. स्वतःच्या जिवाची परवा न करता नागरिकांना किराणा विक्री करत आहेत. 

जीव धोक्‍यात घालून लोकांच्या सेवेत कार्यरत
कोरोनाच्या भीतीने सगळेच आवश्‍यक ती काळजी घेत घरातच आहेत. किराणा आणि स्वस्त धान्य दुकानदार अत्यावश्‍यक सेवा म्हणून ते नियमित धान्य विक्री करत आहेत. स्वस्त धान्य दुकानदार शासनाकडून आलेले सवलतीच्या दरातील आणि मोफत धान्य वाटप करीत आहेत. गरीब, गरजू नागरिकांना अन्नधान्य पुरविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांना रोज शेकडो नागरिकांचा सामना करावा लागतो. असे असताना दुकानदार आणि त्यांचे कर्मचारी त्यांचा जीव धोक्‍यात घालून लोकांच्या सेवेत कार्यरत आहेत. स्वतःसह इतरांच्या कुटुंबाचे पोट भरण्याची जबाबदारी हेरून ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत. 

नागरिकांत जनजागृतीही 
धान्य विक्री करताना किंवा मोफत धान्य वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगकडे विशेष लक्ष दिले जात आहे. दुकानासमोर दोरी बांधून अंतर ठेवले जात आहे. नागरिकांना एकमेकांमध्ये किमान एक मीटरचे अंतर ठेवणे, तोंडाला मास्क लावणे किंवा रुमालाचा वापर करणे यांसारख्या गोष्टींबाबत जागृती करत आहेत. 

स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे इतरांचेही कुटुंब
दुकानात होणाऱ्या गर्दीने भीती वाटते. धान्य अत्यावश्‍यक सेवेत मोडते. जगण्यासाठी धान्य आवश्‍यक आहे. लाभार्थ्यांपर्यंत ते पोचविणे आपले कर्तव्य आहे. स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे इतरांचेही कुटुंब आहे. या विचाराने कर्तव्य बजावत आहे. - इब्राहिम सय्यद, दुकानदार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SL vs NZ, T20 WC: श्रीलंकेच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी, न्यूझीलंडच्या फलंदाजांची हाराकिरी! पाकिस्तानच्या ताफ्यात आनंद

तीन वेळा डेडलाईन… तरीही योजना कागदावरच का? 'झिरो प्रिस्क्रिप्शन’चा अर्थसंकल्पात स्पष्ट उल्लेख नाही!

Google Search : फेब्रुवारी महिन्यात सगळ्यात जास्त बघण्यात आले 'हे' 5 व्हिडिओ, गुगल सर्च ट्रेंड डेटामुळे जगभर खळबळ

Latest Marathi News Live Update : वाहतूक कोंडीच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी रिपाईचे रास्ता रोको आंदोलन

SCROLL FOR NEXT